31 मेपर्यंत 1 लाख टन तूर खरेदीला केंद्राची परवानगी

By Admin | Published: May 8, 2017 06:17 PM2017-05-08T18:17:58+5:302017-05-08T22:29:49+5:30

तूर उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं दिलासा दिला आहे.

Center approval for procurement of one lakh tonnes of tur to 31 May | 31 मेपर्यंत 1 लाख टन तूर खरेदीला केंद्राची परवानगी

31 मेपर्यंत 1 लाख टन तूर खरेदीला केंद्राची परवानगी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - तूर उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला आणखी 1 लाख टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.

महाराष्ट्राने 2 लाख टन खरेदीसाठी परवानगी मागितली असतानाच केंद्रानं 1 लाख टन तूर खरेदी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर मुद्द्यावर आजच केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर हा दिलासादायक निर्णय केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिला आहे.

मात्र एक लाख टन तूर खरेदीची परवानगी दिली असली, तरी बारदाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. याआधी बारदाण्याअभावी तूर खरेदी रखडली होती. केंद्र शासनाने तूर खरेदीचे शासकीय केंद्र पुढे सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य शासन २२ एप्रिलपर्यंत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करेल, अशी घोषणा शासनाने केली होती. मात्र आता शासनाने तूर खरेदीी मुदत 31 मे पर्यंत वाढवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

 

Web Title: Center approval for procurement of one lakh tonnes of tur to 31 May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.