महाराष्ट्राच्या १२५० मेगावॅट सौर ऊर्जा पार्कला केंद्राची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 06:21 AM2021-07-24T06:21:43+5:302021-07-24T06:22:28+5:30

सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारच्या तीन प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजूरी दिली असून या तिन्ही पार्कांची क्षमता १२५० मेगावॅटची असेल.

center approves 1250 MW solar power park in maharashtra | महाराष्ट्राच्या १२५० मेगावॅट सौर ऊर्जा पार्कला केंद्राची मंजुरी

महाराष्ट्राच्या १२५० मेगावॅट सौर ऊर्जा पार्कला केंद्राची मंजुरी

Next

नितीन अग्रवाल

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारच्या तीन प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजूरी दिली असून या तिन्ही पार्कांची क्षमता १२५० मेगावॅटची असेल. या प्रस्तावांना देशभरात “सौर पार्क आणि अल्ट्रा मेगा सौर विद्युत परियोजनांच्या विकासासाठी चालवल्या जात असलेल्या योजनेअंतर्गत मंजूरी दिली गेली आहे. ऊर्जा व विद्युत मंत्री आर. के. सिंह यांनी सांगितले की, देशात २० हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क करण्याचे लक्ष्य ठेवले गेले होते. परंतु, ते वाढवून ४० हजार केले गेले आहे. लोकसभेत भावना गवळी यांनी  प्रश्न विचारला होता.

टीएमसीचे खासदार सेन निलंबित

नवी दिल्ली : राज्यसभेत गुरुवारी माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातील कागद हिसकावून फाडून टाकल्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार संतनू सेन यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी शुक्रवारी निलंबित करण्यात आले. सेन यांच्या निलंबनाचा सरकारने मांडलेला प्रस्ताव संमत झाला.

Web Title: center approves 1250 MW solar power park in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.