केंद्राकडून 6 नव्या आयआयटींना मान्यता, आयएसएम धनबादचं आयआयटीत रुपांतर
By admin | Published: May 25, 2016 10:11 PM2016-05-25T22:11:30+5:302016-05-25T22:11:30+5:30
केंद्र सरकारकडून 6 नव्या आयआयटी(इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)ना मान्यता देण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25- केंद्र सरकारकडून 6 नव्या आयआयटी(इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)ना मान्यता देण्यात आली आहे. या आयआयटींची तिरुपती, पलक्कड, धारवार, बिलाई, गोवा आणि जम्मूमध्ये स्थापन करण्यात येणार आहे.
तसेच इंडियन स्कूल ऑफ माइन (आयएसएम) धनबादचेही आयआयटीत रुपांतर करण्यात येणार आहे. 1961च्या द इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅक्टनुसार या आयआयटींना मान्यता देण्यात आली आहे. या सहा आयआयटींना मान्यता देण्यात आली असून, राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था म्हणून त्यांना घोषित करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.
या आयआयटी अनुक्रमे आंध्र प्रदेशमधल्या तिरुपती, केरळमधल्या पलक्कड, कर्नाटकातल्या धारवार, छत्तीसगडमधल्या बिलाई, गोवा आणि जम्मू काश्मीरमधल्या जम्मूमध्ये स्थापन होणार आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळानं आंध्र प्रदेशमध्ये एनआयटी स्थापन करण्यासाठीही मान्यता दिली आहे. आंध्र प्रदेशमधल्या सोसायटी कायदा 2001च्या अंतर्गत या एनआयटीला मान्यता दिली आहे, अशी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.