राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
By admin | Published: October 8, 2015 05:08 AM2015-10-08T05:08:50+5:302015-10-08T05:08:50+5:30
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या २२५०० पेक्षा जास्त सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्लीच्या इंडिया गेटशेजारी ५०० कोटी रुपये खर्चाचे
नवी दिल्ली : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या २२५०० पेक्षा जास्त सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्लीच्या इंडिया गेटशेजारी ५०० कोटी रुपये खर्चाचे एक राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालय स्थापन करण्याची सशस्त्र दलांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मान्य केली.
हे राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालय पुढच्या पाच वर्षांत बांधून पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात २२५०० पेक्षा जास्त सैनिकांनी देशाचे ऐक्य आणि अखंडतेच्या रक्षणार्थ आणि देशहितासाठी आपले बलिदान दिलेले आहे. परंतु या सैनिकांच्या सन्मानार्थ देशात कुठेही स्मारक बांधण्यात आलेले नाही.
दुहेरी कर समझोता दुरुस्ती प्रस्ताव
काळ्या पैशाला आळा घालण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी इस्रायल आणि व्हिएतनामसोबत कर समझोता आणि संबंधित प्रणालीत दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)