केंद्राने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना दिली मंजुरी
By admin | Published: June 28, 2017 09:02 PM2017-06-28T21:02:53+5:302017-06-28T21:02:53+5:30
सातव्या वेतन आयोगाने केलेल्या भत्त्यांसदर्भात केलेल्या शिफारशींना केंद्र सरकारने आज मंजुरी दिली. यामध्ये महत्त्वपूर्ण अशा
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - सातव्या वेतन आयोगाने केलेल्या भत्त्यांसदर्भात केलेल्या शिफारशींना केंद्र सरकारने आज मंजुरी दिली. यामध्ये महत्त्वपूर्ण अशा घरभाडे भत्त्याचासुद्धा समावेश आहे. गेल्या वर्षी सातवा वेतन आयोग लागू करताना दुसरे भत्ते आणि घर भाडे भत्त्याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर यासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी मान्य करत केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली. नवे भत्ते आणि सुविधा 1 जुलै 2017 पासून लागू होणार असून, त्याचा लाभ सुमारे 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. मात्र या शिफारशींच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकारवर 30 हजार 728 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार भत्ते वाढवताना केंद्र सकराने नर्सिंग स्टाफ आणि जवानांच्या भत्त्यांमध्ये सुद्धा वाढ केली आहे. तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या वैद्यकीय भत्ते दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातव्या वेतन आयोगापूर्वी कर्मचाऱ्यांना 196 प्रकारचे भत्ते मिळत होते. पण सातव्या वेतन आयोगामध्ये आयोगाने अनेक भत्ते समाप्त केले आहेत. आता फक्त 55 भत्ते बाकी आहेत. याआधी 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता.