कांद्याबाबत केंद्राची योजनाच नाही

By admin | Published: September 8, 2016 05:56 AM2016-09-08T05:56:18+5:302016-09-08T05:56:18+5:30

शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १00 रुपये देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला असला आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला असला तरी केंद्राकडे तशी योजनाच नसल्याने अडचण येत आहे

The center does not have plans for onions | कांद्याबाबत केंद्राची योजनाच नाही

कांद्याबाबत केंद्राची योजनाच नाही

Next

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १00 रुपये देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला असला आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला असला तरी केंद्राकडे तशी योजनाच नसल्याने अडचण येत आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी दिल्लीत दिली.
अन्न व नागरी पुरवठामंत्री राम विलास पासवान यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, तशी योजना नसल्याने केंद्राने राज्याचा प्रस्तावच नाकारला आहे. मात्र आपण पासवान यांना शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्यानंतर कॅबिनेटसमोर आपण तसा प्रस्ता ठेवू, असे आश्वासन त्यांनी आपणास दिले. सुभाष देशमुख म्हणाले की, केंद्र सरकारने निर्यात अनुदान वाढवावे अशी महाराष्ट्राची मागणी आहे. सध्या पाच टक्के अनुदान दिले जात असून, त्यात वाढ करण्यात यावी, अशी विनंती आपण राम विलास पासवान यांना केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The center does not have plans for onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.