केंद्राकडून मनरेगासाठी १२,२३० कोटी जारी
By admin | Published: April 10, 2016 03:49 AM2016-04-10T03:49:13+5:302016-04-10T03:49:13+5:30
केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना मनरेगासाठी शनिवारी राज्यांना आपल्या भागीदारीतील १२,२३० कोटी रुपये जारी केले.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना मनरेगासाठी शनिवारी राज्यांना आपल्या भागीदारीतील १२,२३० कोटी रुपये जारी केले.
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केंद्राला मनरेगासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून न दिल्याबद्दल फटकारले होते. ग्रामीण विकास मंत्रालयातील सूत्रांच्या सांगण्यानुसार मंत्रालयाने योजनेकरिता प्रथमच एवढी मोठी रक्कम दिली आहे. ग्रामीण विकासमंत्री वीरेंद्रसिंग यांनी यासंदर्भात सांगितले की, मंत्रालयाने आपली योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) च्या अंमलबजावणीसाठी १२,२३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीचा वापर गेल्या आर्थिक वर्षातील राज्यांच्या रोजंदारीवरील खर्चासाठी केला जाईल. त्याचप्रमाणे नव्या आर्थिक वर्षात (२०१६-१७) योजनेच्या अंमलबजावणीतही या पैशांची मदत होईल. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्रोत उपलब्ध करून देण्यास सरकार वचनबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)