जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार सुरू करणार चर्चा - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 06:35 PM2017-10-23T18:35:04+5:302017-10-23T19:31:47+5:30

ऑपरेशन ऑलआऊटच्या माध्यमातून लष्कराने काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर आता केंद्र सरकारने राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.

Center to launch peace talks in Jammu and Kashmir: Rajnath Singh | जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार सुरू करणार चर्चा - राजनाथ सिंह

जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार सुरू करणार चर्चा - राजनाथ सिंह

Next

नवी दिल्ली -  ऑपरेशन ऑलआऊटच्या माध्यमातून लष्कराने काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर आता केंद्र सरकारने राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्यातील घटकांशी चर्चा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. तसेच या चर्चेसाठी आयबीचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. 
काश्मीरमधील चर्चेसंबंधी राजनाथ सिंह म्हणाले, सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिनेश्वर शर्मा हे जम्मू काश्मीरमधील लोकांच्या आशा अपेक्षा समजून घेण्यासाठी चर्चा सुरू करतील. शर्मा यांना चर्चा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य असेल. दिनेश्वर शर्मा यांना कॅबिनेट सचिव पदाचा दर्जा असेल. तसेच काश्मीरमध्ये कुणासोबत चर्चा करायची, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शर्मा यांना असेल."  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर प्रश्नाबाबत खूप गंभीर असल्याचेही राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले. तसेच काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यात येणार का, असे विचारले असता त्याबाबतचा अंतिम निर्णय दिनेश्वर शर्मा हेच घेतील, असेही सिंह पुढे म्हणाले.  
 राजनाथ सिंह पुढे म्हणाले,"काश्मीरमधील चर्चेची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तसेच यामध्ये काश्मिरी तरुणांवर विशेष लक्ष दिले जाईल. सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिनेश्वर शर्मा यांना कुठल्याही पक्षाशी चर्चा करण्याचे स्वातंत्र्य असेल." केंद्र सरकार सर्व राजकीय पक्ष आणि जम्मू आणि काश्मीरमधील सर्व पक्षांसोबत चर्चा करण्याची तयारी करत आहे. ज्यामुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा शांतता प्रक्रिया प्रस्थापित होऊ शकेल." 
दरम्यान, - लष्कराने ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेंतर्गत गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. कारवाईमध्ये काश्मीर खोऱ्यात वावरणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून शोधून कंठस्नान घालण्यात येत आहे. दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोपियाँ परिसरावर चढाई करण्याची तयारी लष्कराकडून करण्यात येत आहे. या भागात काही दिवसांपासून लष्कराच्या हालचाली वाढल्या असून, तेथे लष्कराचे नवे तळ उभारण्यात येत आहेत. तसेच सीआरपीएफची राखीव तुकडीही येथे दाखल झाली आहे. 
 दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ भाग दहशतवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित भाग मानला जातो. या परिसरात दहशतवादी मोकळेपणाचे फिरताना दिसायचे. मात्र आता येथे लष्कराच्या  हालचाली वाढल्या आहेत. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी एप्रिल महिन्यात लष्कराने शोपियाँमधील हेफ शीरमाल भागात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी लष्कराला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स(सीआरपीएफ) च्या अधिकाऱ्यांनी शोपियाँमधील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देण्यास सुरुवात केली." शोपियाँ जिल्हा पीर पंजाल पर्वताच्या दक्षिणेस आहे. तसेच जम्मू विभागातील डोडा, किश्तवाड आणि पुंछ परिसरात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांच्या मार्ग आहे.  

Web Title: Center to launch peace talks in Jammu and Kashmir: Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.