प्लास्टिक, थर्माकोलबंदीच्या सूचना केंद्राने केल्या प्रसिद्ध; २ ऑक्टोबरपासून लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 06:57 AM2019-10-01T06:57:32+5:302019-10-01T06:57:51+5:30
केंद्र सरकारची प्लॅस्टिकबंदी बुधवार, २ आॅक्टोबरपासून देशभर लागू होत असून, त्यात थर्मोकोलच्या वस्तू, तसेच प्लॅस्टिकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : केंद्र सरकारची प्लॅस्टिकबंदी बुधवार, २ आॅक्टोबरपासून देशभर लागू होत असून, त्यात थर्मोकोलच्या वस्तू, तसेच प्लॅस्टिकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे. एवढेच नव्हे, ५१ मायक्रॉनवरील पिशव्यांवरही ही बंदी आहे. मात्र, प्लॅस्टिकच्या बाटल्यांना यातून वगळण्यात आले आहे.
या संदर्भात सर्व राज्यांसाठी एक आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक अशा दोन अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक उपक्रम, कंपन्या, खासगी कंपन्या, सर्व सरकारी व खासगी कंपन्या, कार्यालये यांचा त्यात समावेश आहे. सर्व सरकारी व खासगी कार्यालयांना प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या बंदीमुळे यापुढे कोणत्याही आकाराच्या व जाडीच्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, स्ट्रॉ, सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वस्तू वापरता येणार नाहीत.
सरकारी व खासगी कार्यालयात प्लॅस्टिक व थर्माकोलची फुले, बॅनर्स, झेंडे, कुंड्या, बाटल्या, फोल्डर्स वा प्लॅस्टिक, थर्माकोलच्या वस्तू न वापरण्याच्या सूचना आहेत.
उत्पादनच घेऊ नका
कारखान्यांनीही एकदाच वापरता येणाºया प्लॅस्टिकच्या पिशव्या वा वस्तू तयार करू नयेत, असेही या अधिसूचनेत म्हटले आहे, तसेच प्लॅस्टिकच्या पुनर्वापराची व नष्ट करण्याची व्यवस्था करावी, असेही म्हटले आहे. या आधी २0१६ सालीही केंद्र सरकारने अशाच सूचना प्लॅस्टिक उद्योगाला दिल्या होत्या.