केंद्राकडून ५ हजार कोटींचे पॅकेज आणा - खाण अवलंबितांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Published: May 9, 2015 01:45 AM2015-05-09T01:45:15+5:302015-05-09T01:45:15+5:30
पणजी : खाण अवलंबितांसाठी केंद्राकडून ५ हजार कोटींचे पॅकेज आणा, अशी मागणी मायनिंग पीपल्स फ्रंटने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.
Next
प जी : खाण अवलंबितांसाठी केंद्राकडून ५ हजार कोटींचे पॅकेज आणा, अशी मागणी मायनिंग पीपल्स फ्रंटने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले. खाणमालकांना कामगारांच्या नोकर्या शाबूत ठेवण्याचे, तसेच सेवा शर्थींची पूर्तता करण्याचे आदेश दिले जावेत, खनिज निर्यात कर पुनर्रचना करावी, ट्रकमालक, बार्जमालक यांना खनिज वाहतुकीसाठी योग्य तो दर द्यावा, ज्यांनी एक रकमी कर्जफेड योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांची कर्जे सरकारे डोक्यावर घ्यावीत, कामगारांना ५0 टक्के वेतन मिळेल याची खबरदारी घ्यावी, तसेच सर्व सोपस्कार पूर्ण करून ५४ खाणी लवकरात लवकर चालू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, आयटकने जीवरक्षकांच्या प्रश्नावर सेवेतून काढून टाकलेल्या १७ जणांना पुन्हा नोकरीत घ्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांच्या सेवाशर्थींबाबत अभ्यासार्थ उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, तसेच महिना २१ हजार रुपये किमान पगाराची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)