दुष्काळावर केंद्राची २ हजार कोटींची मदत
By admin | Published: March 25, 2015 02:36 AM2015-03-25T02:36:51+5:302015-03-25T02:36:51+5:30
दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
सर्वाधिक पॅकेज : अवकाळी मदत राज्यानेच उभारावी
नवी दिल्ली : दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही रक्कम मागणीच्या अवघी ३३ टक्के असली तरी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीने देऊ केलेली रक्कम केंद्राच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येत असून, राज्यानेच शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निधीतून मदत करावी, अशी
भूमिका उच्चस्तरीय समितीने घेतली.
त्यानुसार मदतीचे वर्गीकरण न करता
आपत्ती निवारणाच्या निकषानुसार तिचे वाटप
राज्य सरकार करेल असे केंद्राने स्पष्ट केले. मागच्या वर्षी केंद्राने ५०० कोटींची मदत केली
होती, यंदा २ हजार कोटींची केली आहे, असे मोठ्या अभिमानाने कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांनी सांगितले.
राज्य सरकारने केंद्राकडे ६ हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव सादर केला होता. राज्यातील २३ हजार ८११ गावांमध्ये सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असून, केंद्राने मदत करावी म्हणून राज्य सरकारने सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला होता.
जादा मदतीचे पॅकेज सरकार मागतच असते, मात्र केंद्र व राज्याशी समन्वय साधून समितीने दुष्काळी मदतीचा निर्णय घेतला. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण कोषातून भरपाई द्यावी. - राधा मोहन सिंग, कृषिमंत्री