CBSE Results 2020 : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 01:17 PM2020-07-13T13:17:30+5:302020-07-13T14:28:31+5:30

CBSE Results 2020 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. 

Central Board of Secondary Education class 12 exam results announced | CBSE Results 2020 : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

CBSE Results 2020 : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईचे निकाल 15 जुलैपूर्वी जाहीर होऊ शकतात अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी (13 जुलै) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. 

असा पाहाल निकाल 

- सर्वप्रथम निकाल पाहण्यासाठी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in वर जा.

- वेबसाईटवर देण्यात आलेल्या बारावी निकाल या लिंकवर क्लिक करा.

- आपला रोल नंबर टाका आणि आवश्यक ती माहिती द्या 

- निकाल पाहता येईल. डाऊनलोड करता येईल.

सीबीएसई बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार यंदा 88.78 टक्के विद्यार्थांनी बारावीची परीक्षा पास केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात 92.15 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 86.19 टक्के मुलं पास झाली आहेत. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus News : "कोरोनाच्या लढाईत सरकार फेल पण क्रेडिट चोरीत केजरीवाल अव्वल"

...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; मुसळधार पावसामुळे कोसळली इमारत, थरकाप उडवणारा Video 

Rajasthan Political Crisis : "तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर आपण जागे होणार आहोत का?"

"पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वच जण गुन्हेगारांना आश्रय देतात"

CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या संकटात देशातील 62 टक्के मुलांचं थांबलं शिक्षण, धक्कादायक अहवाल

Web Title: Central Board of Secondary Education class 12 exam results announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.