केंद्रीय निवडणूक आयोगानं मला ब्रँड अँबेसेडर करावं- केजरीवाल
By Admin | Published: January 23, 2017 05:52 PM2017-01-23T17:52:54+5:302017-01-23T17:52:54+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना लाच देण्यासंदर्भातील वक्तव्यावर नोटीस बजावली होती.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना लाच देण्यासंदर्भातील वक्तव्यावर नोटीस बजावली होती. त्यासंदर्भात केजरीवालांनी निवडणूक आयोगाला लिखित स्वरुपात उत्तर दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानं मला ब्रँड अँबेसेडर करावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या लिखित स्वरुपातील कॉपीची एक प्रत अरविंद केजरीवालांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केली आहे.
ते म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोग गेल्या 70 वर्षांपासून निवडणुकीत खर्च होणारा अमाप पैसा रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. दुस-या पक्षावाले पैसे देतील ते घ्या आणि व्होट मात्र झाडूलाच द्या, असं म्हटल्यामुळे लाचखोरी बंद होईल. हा प्रयोग केंद्रीय निवडणूक आयोगानं केल्यास येत्या दोन वर्षांत सर्व पक्ष निवडणुकीच्या काळात पैसा वाटणं बंद करतील. दिल्लीत असं घडलं असून, लोकांनी काँग्रेस आणि भाजपाकडून पैसे घेतले. मात्र आम आदमी पार्टीला मत दिलं.
(अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस)
(नोटाबंदी स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा - अरविंद केजरीवाल)
तत्पूर्वी गोव्यातील सभेत निवडणुकीत कुणी पैसे घेऊन आले तर ते नाकारू नका, पाच हजार दिल्यास तीन पटीने अधिक मागणी करा आणि नव्या करकरीत नोटा घ्या, परंतु मतदान मात्र आम आदमी पार्टीच्या झाडूसाठीच करा,' असे आवाहन केजरीवाल यांनी साखळी येथील जाहीर सभेत केले होते. त्या वक्तव्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगानं नोटीस बजावत आम आदमी पार्टीची मान्यता रद्द करण्याचाही इशारा दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचंही म्हटलं होतं. आता निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर खुलासा करत त्यांनी ब्रँड अँबेसेडर करावं, असं म्हटलं आहे.
My letter to Chief Election Commissioner. There ought to be a public debate on this issue pic.twitter.com/bpBA4iwGPw
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 23 January 2017