केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 06:58 AM2024-10-17T06:58:03+5:302024-10-17T06:59:21+5:30

निर्णयाचा १.१५ कोटी केंद्रीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना लाभ होईल.

Central employees' Diwali dearness allowance increased by 3% | केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) तसेच निवृत्तिवेतनधारकांच्या महागाई दिलाशात (डीआर)  बुधवारी ३ टक्के वाढ केली. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांच्या घरात दिवाळीपूर्वीच दिवाळी आली आहे. निर्णयाचा १.१५ कोटी केंद्रीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना लाभ होईल.

दिलेली ३ टक्के वाढ पूर्वलक्षी प्रभावाने १ जुलै २०२४ पासून लागू होईल. त्यापोटी केंद्र सरकारच्या तिजोरीवर ९,४४८ कोटी रुपयांचा बोजा पडेल. कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या डीए व डीआरमधील वाढ ठरवताना सर्वाधिक ताज्या औद्योगिक कामगार-ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीचा आधार घेतला जातो. हा निर्देशांक केंद्रीय मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या श्रम ब्युरोकडून दर महिन्याला जारी केला जातो. डीए व डीआर वाढ निश्चितीसाठी सातव्या वेतन आयोगाचा फॉर्म्युला वापरला जातो. 

Web Title: Central employees' Diwali dearness allowance increased by 3%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.