केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

By admin | Published: March 15, 2017 08:38 PM2017-03-15T20:38:13+5:302017-03-15T21:21:11+5:30

देशातील केंद्रीय कर्मचा-यांसाठी एक खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्यात दोन टक्क्यांची वाढ केली आहे.

Central employees' rise in inflation relief | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - देशातील केंद्रीय कर्मचा-यांसाठी एक खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्यात दोन टक्क्यांची वाढ केली आहे. 
केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची बुधवारी संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे देशातील 55 लाख 51 हजार निवृत्तीधारकांना तर 48 लाख 85 हजार कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार आहे. सर्व कर्मचा-यांच्या महागाई भत्यात ही वाढ एक जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे.  
याचबरोबर कॅबिनेट मंत्रिमंडळाने आयआयटी संशोधन विधेयक,  सातव्या वेतन आयोगाची शिफारस आणि भारत - बांगलादेश सीमेवरील सुरक्षेसंदर्भातील सुधारीत मसूदा मंजूर केला. तसेच, उत्तरप्रदेशातील नॅशनल हायवे-2 वर वाराणसीपासून हंडिया सेक्शनला सहा लेन करण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. 
 

Web Title: Central employees' rise in inflation relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.