पेट्रोलमधून प्रतिलीटर ३३ रु, तर डिझेलमधून ३२ रुपयांची कमाई; सरकारनं लोकसभेत केलं मान्य   

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 06:11 PM2021-03-15T18:11:55+5:302021-03-15T18:12:44+5:30

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती २७ फेब्रुवारीपासून स्थिर आहेत. निवडणुकीच्या काळात सरकारसाठी ही चांगली गोष्ट असली तरी आज लोकसभेत केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलमधून बक्कळ कमाई मिळत असल्याचं मान्य केलं आहे. 

central government admits in lok sabha its earning almost 33 per litre of petrol and 32 per litre diesel since may 2020 | पेट्रोलमधून प्रतिलीटर ३३ रु, तर डिझेलमधून ३२ रुपयांची कमाई; सरकारनं लोकसभेत केलं मान्य   

पेट्रोलमधून प्रतिलीटर ३३ रु, तर डिझेलमधून ३२ रुपयांची कमाई; सरकारनं लोकसभेत केलं मान्य   

Next

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती २७ फेब्रुवारीपासून स्थिर आहेत. निवडणुकीच्या काळात सरकारसाठी ही चांगली गोष्ट असली तरी आज लोकसभेत केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलमधून बक्कळ कमाई मिळत असल्याचं मान्य केलं आहे. (Central Government Earing From Petrol And Diesel)

पेट्रोलमधून ३३ रुपये, तर डिझेलमधून ३२ रुपयांची कमाई
केंद्र सरकारनं एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मान्य केलं की ६ मे २०२० नंतर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क, उपकर आणि अधिकार यांच्यातून अनुक्रमे प्रतिलीटर ३३ रुपये आणि ३२ रुपयांची कमाई होते. मार्च २०२० ते मे २०२० या काळात पेट्रोल आणि डिझेलमधून मिळणारी कमाई अनुक्रमे २३ आणि १९ रुपये इतकी होती. 

वर्षभरात तब्बल १३ रुपयांनी वाढली सरकारची कमाई
गेल्या वर्षी १ जानेवारी ते १३ मार्च २०२० या काळात केंद्र सरकारची पेट्रोल आणि डिझेलमधून होणारी कमाई अनुक्रमे २० रुपये आणि १६ रुपये प्रतिलीटर इतकी होती, अशी माहिती सरकारनं लोकसभेत दिली. पण आता ३१ डिसेंबर २०२० मधील कमाईशी तुलना करायची झाल्यास पेट्रोलमधून होणाऱ्या कमाईत प्रतिलीटरमागे १३ रुपये आणि डिझेलमधून प्रतिलीटरमागे १६ रुपयांनी कमाईत वाढ झाली आहे. 

निवडणूक काळात का वाढत नाहीयत किमती?
जर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीनुसार पेट्रोल-डिझेलचे दर ठरत असतात मग देशात चार राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं आताच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर कशा? असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला. त्यावर सरकारनं चुप्पी साधल्याचं पाहायला मिळालं. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरविण्यासाठी वेगवेगळी कारणं कारणीभूत असतात यात इतर देशांतील सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींचा देखील समावेश असतो. सरकार या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवत नाही, असं म्हणाले. 
 

Web Title: central government admits in lok sabha its earning almost 33 per litre of petrol and 32 per litre diesel since may 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.