केंद्र सरकारने ९ हजार एनजीओंचे परवाने रद्द केले

By admin | Published: April 28, 2015 10:13 AM2015-04-28T10:13:26+5:302015-04-28T10:16:12+5:30

परदेशातून देणग्या स्वीकारणा-या गैरसरकारी संस्थांवर (एनजीओ) मोदी सरकारने कारवाईचा धडाका सुरु केला असून सोमवारी रात्री सरकारने तब्बल ८,९७५ एनजीओंचे परवाने रद्द केले आहेत.

The central government canceled 9,000 NG licenses | केंद्र सरकारने ९ हजार एनजीओंचे परवाने रद्द केले

केंद्र सरकारने ९ हजार एनजीओंचे परवाने रद्द केले

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ - परदेशातून देणग्या स्वीकारणा-या गैरसरकारी संस्थांवर (एनजीओ) मोदी सरकारने कारवाईचा धडाका सुरु केला असून सोमवारी रात्री सरकारने तब्बल ८,९७५ एनजीओंचे परवाने रद्द केले आहेत. मोदी सरकारच्या या आक्रमक पवित्र्यांनी एनजीओ चालवणा-यांचे धाबे दणाणले आहेत. 

काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने ग्रीनपीस संघटनेच्या विदेशातून मिळणा-या मदतीवर निर्बंध घातले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील १०, ३४३ एनजीओंना नोटीस पाठवत २००९ -१०, २०१० -११ आणि २०११ -१२ या आर्थिक वर्षातील रिटर्न सादर करायला सांगितले होते. यात परदेशातून मिळालेल्या देणगीचा नेमका आकडाही समजणार होता. यातील फक्त २२९ एनजीओंनी त्यांचा वार्षिक लेखाजोखा गृहमंत्रालयाला सादर केला आहे. गृहमंत्रालयाच्या नोटिसीला उत्तर न देणा-या ८, ९७५ एनजीओंचे परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी रात्री उशीरा करण्यात आली. यातील ५१० एनजीओ अशा आहेत ज्यांना नोटीस पाठवण्यात आली मात्र ती कोणीच स्वीकारली नसल्याने नोटीस परत आली. 

 

Web Title: The central government canceled 9,000 NG licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.