सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; वंदे मातरम मोहिमेच्या धर्तीवर प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 06:17 AM2021-08-19T06:17:13+5:302021-08-19T06:17:34+5:30

Jyotiraditya Scindia : केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती. 

Central Government committed to repatriate all Indians, Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia; Efforts on the lines of Vande Mataram campaign | सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; वंदे मातरम मोहिमेच्या धर्तीवर प्रयत्न

सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; वंदे मातरम मोहिमेच्या धर्तीवर प्रयत्न

Next

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. कोरोना साथीमुळे इतर देशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे मातरम मोहीम राबविली होती. अगदी त्याच धर्तीवर अफगाणिस्तानातील भारतीयांसाठी आमचे प्रयत्न जारी आहेत, असेही ते म्हणाले.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानींनी सत्ता काबीज केली असून, त्यामुळे तिथे राहणारे विविध देशांतील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर आपल्या मायदेशी परत जायचे आहे. केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती. 
मध्य प्रदेशमधील शाजापूर येथे शिंदे यांनी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेस केंद्र सरकारने १३ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. मात्र गेल्या रविवारी विमान अफगाणिस्तानातील भारतीयांना घेऊन उड्डाण करणार होते, त्याच्या आधीच काबूल विमानतळावर गोळीबार झाला. त्यामुळे धोक्याची सूचना मिळाल्यामुळे हे उड्डाण त्यावेळी होऊ शकले नव्हते. तसेच काबूलची हवाई हद्दही त्यावेळी बंद करण्यात आली होती. 

एस. जयशंकर यांची गुटेरस यांच्याशी चर्चा
अफगाणिस्तानातील स्थितीसंदर्भात परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस व अन्य अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली. तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता बळकावली.  
त्यामुळे त्या देशात गोंधळ माजला आहे,त्याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली.  

Web Title: Central Government committed to repatriate all Indians, Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia; Efforts on the lines of Vande Mataram campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.