केंद्र सरकारची मोठी घोषणा! सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन, पगारात भरघोस वाढ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 08:53 PM2022-07-26T20:53:58+5:302022-07-26T20:55:04+5:30
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मोठी घोषणा केली आहे. १ जुलै रोजी ८ हजाराहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रमोशनची घोषणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा अनेक अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जाणार आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मोठी घोषणा केली आहे. १ जुलै रोजी ८ हजाराहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रमोशनची घोषणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा अनेक अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जाणार आहे. केंद्र सरकारकडून येत्या दोन ते तीन आठवड्यात पदोन्नतीच्या बाबतीत मोठी घोषणा केली जाणार आहे. यासंबंधीचं ट्विट PIB नं केलं आहे. केंद्र सरकारकडून पुढील स्लॉटमध्ये ग्रूप-A मधील अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जाऊ शकतं.
केंद्रीय सचिवालय राजभाषा सेवा ग्रूप-A मधील अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळानं आज केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. या भेटीत अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रमोशनबाबतची माहिती मंत्र्यांना दिली. प्रतिनिधीमंडळानं केलेल्या मागण्यांचा विचार केला जाईल असं मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं आहे. प्रमोशनच्या बाबतीत निर्माण झालेल्या अडचणींवर तोडगा काढला जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे.
Union Minister @DrJitendraSingh says, after granting mass promotion to over 8,000 government employees on the 1st of July, DoPT is now ready with next lot of officers who will get promotion in the next two to three weeks
— PIB India (@PIB_India) July 26, 2022
Read here: https://t.co/kFN0RvKO9Apic.twitter.com/KjUfxatETx
ग्रूप-A कर्मचाऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांनी दिलं आश्वासन
या भेटीत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी शिष्टमंडळाला त्यांच्या पदोन्नतीच्या बाबत नियमानुसार जलद गतीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिलं. याआधी, १ जुलै २०२२ पासून, DoPT ने एकाच वेळी तीन प्रमुख सचिवालय सेवांशी संबंधित ८,०८९ हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पदोन्नती दिली होती.
कोणत्याही पदोन्नतीशिवाय सेवेतून निवृत्त होणे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ८,०८९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यामधील सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यामुळे भविष्यातील सर्व पदोन्नती आतापासून सुरळीत केल्या जातील, असं ते म्हणाले.
१ जुलैला ८ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रमोशन
१ जुलै २०२२ रोजी केंद्र सरकारनं तीन केंद्रीय सचिवालय संवर्गातील ८ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. केंद्रीय सचिवालय सेवा ही प्रशासकीय नागरी सेवांपैकी एक आहे, ज्यामध्ये ग्रूप A आणि ग्रूप B पदांवर काम करणारे कर्मचारी आहेत.