केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार? महागाई भत्त्यातील वाढ पुन्हा सुरू होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 06:18 AM2020-12-20T06:18:46+5:302020-12-20T07:04:04+5:30

Central government employees' : सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना १७ टक्के दराने महागाई भत्ता मिळतो. सातव्या वेतन आयोगानुसार, जुलै, २०२१ पासून तो २१ टक्के होणे अपेक्षित आहे.

Central government employees' salaries will increase | केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार? महागाई भत्त्यातील वाढ पुन्हा सुरू होण्याची शक्यता

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार? महागाई भत्त्यातील वाढ पुन्हा सुरू होण्याची शक्यता

Next

नवी दिल्ली :  कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा एप्रिलमध्ये स्थगित करण्यात आलेली महागाई भत्त्यातील वाढ २०२१ मध्ये पुन्हा सुरू केली जाण्याची शक्यता असल्यामुळे या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होऊ शकते. याआधीची ४ टक्के वाढ जानेवारीत प्रस्तावित करण्यात आली होती. मार्चमध्ये त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती.

का थांबली होती वाढ?
कोविड १९चे संकट वाढल्यामुळे एप्रिलमध्ये महागाई भत्तावाढ १ जुलै, २०२१ पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आशेचा किरण कशामुळे?
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना १७ टक्के दराने महागाई भत्ता मिळतो. सातव्या वेतन आयोगानुसार, जुलै, २०२१ पासून तो २१ टक्के होणे अपेक्षित आहे. सध्याच्या स्थगितीचा कार्यकाळ संपल्यानंतर महागाई भत्त्यात नियमित पद्धतीने वाढ केली जाईल, अशी आशा कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना वाटते.

असा आहे नियम
वाढत्या महागाईनुसार, सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ करते. 

कोणाला फायदा?
५० लाख केंद्र सरकारीकर्मचारी 
६० लाख निवृत्तिवेतनधारक 

Web Title: Central government employees' salaries will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.