नक्षलवादी भागातील विकासासाठी केंद्र सरकारने दिली मदतीची ग्वाही
By admin | Published: February 10, 2015 12:56 AM2015-02-10T00:56:07+5:302015-02-10T00:56:07+5:30
नवी दिल्ली : नक्षलप्रभावित राज्यांत रस्ते, पूल, शिक्षण आणि अन्य पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासाशी संबंधित योजनांना गती देण्यासोबतच नक्षल्यांविरुद्धच्या मोहिमेत मदतीचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे़
Next
न ी दिल्ली : नक्षलप्रभावित राज्यांत रस्ते, पूल, शिक्षण आणि अन्य पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासाशी संबंधित योजनांना गती देण्यासोबतच नक्षल्यांविरुद्धच्या मोहिमेत मदतीचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे़ आज सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगण आणि ओडिशा या चार नक्षलप्रभावित राज्यांची बैठक पार पडली़ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग या बैठकीला हजर होते़ तथापि तेलंगण आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून दोन्ही राज्यांचे मुख सचिव यांची यावेळी उपस्थिती होती़ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, सुरेश प्रभू आदी उपस्थित होते़ या बैठकीत संबंधित राज्यांनी पायाभूत विकास योजनांसाठीच्या निधी वाटपाबाबत तक्रारीचा सूर लावला़ केंद्रीय मंत्र्यांनी या राज्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या ़केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संबंधित राज्यांतील विकास कामांचा आढावा घेतला़ रस्ते, पूल, रेल्वेमार्ग, मोबाईल टॉवर, टपाल कार्यालये, बँकिंगसोबत शिक्षण आणि आरोग्य सुविधा तसेच वन आणि पर्यावरणविषय योजना व कामांचा यात समावेश होता़ नक्षल्यांचा गड बनू पाहत असलेल्या बस्तर क्षेत्रातील विकासकामांना गती देण्याचे आणि त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज राजनाथ यांनी यावेळी व्यक्त केली़