वाहनधारकांना मोठा दिलासा; केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, पॉल्युशनसह या कागदपत्रांची वैधता वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 05:19 PM2020-08-24T17:19:38+5:302020-08-24T22:06:18+5:30
या निर्णयामुळे मुदत संपत असलेल्या वाहनांच्या कागदपत्रांचे नविनीकरण करण्यासाठी वाहनधारकांना वेळ मिळणार आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणू्च्या संसर्गामुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून अनेक उद्योग व्यवहार बंद आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहनांशी संबंधित फिटनेस, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आरसी, पॉल्युशन सर्टिफिकेट यासारख्या वाहनांच्या वैधतेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे मुदत संपत असलेल्या वाहनांच्या कागदपत्रांचे नविनीकरण करण्यासाठी वाहनधारकांना वेळ मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोटार वाहनाशी संबंधित कुठल्याही कागदपत्रांची मुदत संपली असेल तर त्यासाठी आता वाहनधारकांना चिंता करावी लागणार नाही. तुम्ही अशा कागदपत्रांचे ३१ डिसेंबरपर्यंत नवीनीकरण करून घेऊ शकता. एवढेच नाही तर सरकारने एक्स्पायर होत असलेल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठीची वैधतासुद्धा ३१ डिसेंबरपर्यंत २०२०पर्यंत वाढवली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लॉकडाऊनदरम्यान एका आदेश जारी करून मुदत संपलेले ड्रायव्हिंग लासयन्स, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट आणि अन्य कागदपत्रांची वैधता ३० जून २०२० पर्यंत वाढवली होती. मात्र जून महिन्यापर्यंत परिस्थितीत फार सुधारणा न झाल्याने ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली गेली होती. आता या मुदतीमध्ये सरकारने तिसऱ्यांदा वाढ करून ती डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती