चित्ते भारतात वसवण्याची केंद्र सरकारची योजना; यशापयश दिसणार ५ ते ६ वर्षांनी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 06:11 AM2022-01-07T06:11:31+5:302022-01-07T06:12:03+5:30
वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन.के. रणजित सिंह यांच्यासोबत वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. झाला यांनी २००९ पासून चित्ते भारतात वसवता येतील का, याची शक्यता शोधायला सुरुवात केली होती.
- शरद गुप्ता
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतात ७० वर्षांनंतर आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्याला निवासी बनवण्याची केंद्र सरकारची योजना भारतीय जंगलांना त्यांनी स्वीकारले, तर यशस्वी होऊ शकते. या योजनेचे यशापयश ५ ते ६ वर्षांनी समजू शकेल. देशात वेगवेगळ्या ठिकाणी गेंडे, वाघ, सिंह आणि पेंग्विनना वसवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत; परंतु एखाद दुसरा अपवाद वगळता बाकी अपयशी ठरले. म्हणून प्रोजेक्ट चित्त्याचे पितामह डॉ. वाय.व्ही. झाला हेदेखील याप्रकरणी सरकारला जपून पाऊल टाकण्याचा सल्ला देत आहेत.
वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन.के. रणजित सिंह यांच्यासोबत वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. झाला यांनी २००९ पासून चित्ते भारतात वसवता येतील का, याची शक्यता शोधायला सुरुवात केली होती. त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर जानेवारी, २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला मंजुरी दिली. डॉ. झाला म्हणतात, ‘आफ्रिकन चित्त्यांच्या तुलनेत इराणी चित्ते भारतात रुळवणे सोपे होऊ शकते. कारण त्यांचे जनुक (जीन) १९५२ मध्ये लुप्त झाले होते. ते जनुक भारतीय चित्त्यांशी मिळते-जुळते होते; परंतु इराणमध्ये आता केवळ ३० चित्तेच शिल्लक असून आम्हाला किमान ५० चित्ते हवे आहेत.’
ना सिंह वाचले, ना पेंग्विन
उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी इटावात लायन सफारी बनवली होती; परंतु सगळे सिंह मरून गेले. महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी पेंग्विन आणण्याचा केलेला प्रयत्नही वाया गेला.