मजुरांना रोजगार देण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन, आता शहरातही 'मनरेगा' योजना सुरू करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 11:33 PM2020-09-02T23:33:16+5:302020-09-02T23:38:52+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारीचा सामना करत असलेल्या शहरी भागांतील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार ही योजना शहरी भागांतही सुरू करण्याचा विचार करत आहे. 

central government weighs extension of mgnrega to cover workers in cities | मजुरांना रोजगार देण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन, आता शहरातही 'मनरेगा' योजना सुरू करण्याचा विचार

मजुरांना रोजगार देण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन, आता शहरातही 'मनरेगा' योजना सुरू करण्याचा विचार

Next
ठळक मुद्देमनरेगाची मजुरी वाढवली असून, आता ती 202 रुपये रोज, अशी करण्यात आली आहे.सर्वप्रथम देशातील छोट्या शहरांत योजना सुरू करण्याचा विचारमनरेगा योजनेत मजुराला जास्तीतजास्त 100 दिवसांचा रोजगार देण्याची गॅरंटी दिली जाते. 

नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संकट काळात देशभरात लागू करण्यात आलेल्या  लॉकडाउनमुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागांतील मजुरांनाही बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. मात्र ग्रामीण भागाचा विचार केला, तर तेथील मजुरांना केंद्र सरकारच्या मनरेगा योजनेचा मोठा सहारा मिळाला आहे. यामुळे आता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारीचा सामना करत असलेल्या शहरी भागांतील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार ही योजना शहरी भागांतही सुरू करण्याचा विचार करत आहे. 

सर्वप्रथम देशातील छोट्या शहरांत योजना सुरू करण्याचा विचार -
देशातील शहरीभागातही मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग राहतो. या मजुरांच्या हाताला लॉकडाउनमुळे काम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ही योजना शहरी भागात सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर मजुरांच्या हाताला काम मिळेल. माध्यमांतील वृत्तानुसार, सरकार सर्वप्रथम देशातील छोट्या शहरांत ही योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. कारण छोट्या शहरांतील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. या योजनेवर सरकार सुरुवातील 3,5000 कोटी रुपये खर्च करण्याचा विचार करत आहे. या प्लॅनवर सरकार गेल्या वर्षापासूनच काम करत आहे.

...तर देशाच्या अर्थवयवस्थेला गती मिळेल -
शहरी भागात मनरेगा योजना सुरू झाल्यास देशाच्या अर्थवयवस्थेला गती मिळेल, असे मत जानकारांनी व्यक्त केले आहे. कारण ऑगस्ट महिन्याचा विचार करता, शहरी भागांतील बेरोजगारी दर 9.83 टक्के नोंदवला गेला आहे. तर ग्रामीण भागांतील बेरोजगारी दर 7.65 टक्के नोंदवला गेला आहे. हाच दर जुलै महिन्यात शहरी भागांत 9.15 टक्के तर ग्रामीण भागांत 6.6 टक्के एवढा नोंदवला गेला होता.

मनरेगाची मजुरी 202 रुपये करणयात आली आहे -
केंद्र सरकारच्या वतीने 2020-21च्या अर्थसंकल्पात मनरेगा योजनेसाठी 61,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटाचा विचार करता, सरकारने या योजनेसाठी पुन्हा 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालयाने मनरेगाची मजुरी वाढवली असून, आता ती 202 रुपये रोज, अशी करण्यात आली आहे. मनरेगा योजनेत मजुराला जास्तीतजास्त 100 दिवसांचा रोजगार देण्याची गॅरंटी दिली जाते. 

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine News : "अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर अमेरिकेच्या 4 लशी फेल होण्याची शक्यता"

कोरोना लस तयार व्हायला लागणार उशीर; माकडांच्या तुटवड्यानं संशोधन रखडलं!

शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; पत्नी आणि मुलगीही जखमी

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

Web Title: central government weighs extension of mgnrega to cover workers in cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.