FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:16 PM2020-07-02T13:16:09+5:302020-07-02T13:19:10+5:30

फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड कोणत्याही सरकारी बँकेतून खरेदी केला जाऊ शकतो. कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त हजारच्या पटीमध्ये कितीही गुंतवणूक करता येईल.

Central government Will pay more interest than FD; new floating bond scheme launched | FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

googlenewsNext

नवी दिल्ली : 1 जुलैपासून केंद्र सरकारने (Government of India) फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड 2020 (टॅक्‍सेबल) ही गुंतवणूक योजना सुरु केली आहे. यामध्ये पैसे गुंतविणाऱ्यांना थोडाथोडका नव्हे तर 7.15 टक्के व्याज दर देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेणार आहे. यानुसार व्याजदर बदलण्यात येणार आहेत. 


जुलै महिन्यापासून योजना सुरु झाली म्हणजे पुढील व्याजदरातील बदल हा 1 जानेवारी 2021 मध्ये करण्यात येणार आहे. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास त्याचे व्याज दर महिन्याला न मिळता दर सहा महिन्याला दिले जाणार आहे. हे बाँड्स आरबीआय बाँडच्या बदल्यात लाँच करण्यात आले आहेत. आरबीआय बाँड सरकारने मागे घेतले होते. त्याचे व्याजदर 7.75 टक्के होते. हे व्याजदर बाँडच्या पूर्ण कालावधीसाठी लागू राहणार आहेत. 


कशी गुंतवणूक कराल? 
फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड कोणत्याही सरकारी बँकेतून खरेदी केला जाऊ शकतो. आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेकडून देखील हा बॉन्ड खरेदी करता येणार आहे. या बॉन्डची कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मिळणार नसून तो पूर्णत: डिजिटल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक असणार आहे. बाँडची खरेदी केल्यानंतर ते गुंतवणूकदारांच्या बाँड लेजर खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. रोख रक्कम देऊनही खरेदी करता येतील. मात्र त्याला मर्यादा असणार असून केवळ 20000 रुपयांचेच बॉन्ड रोख रकमेवर मिळणार आहेत. याव्यतिरिक्त ड्राफ्ट, चेक आणि इलेक्ट्रिक पेमेंट मोडच्या माध्यमातून बाँड खरेदी करता येतील.


गुंतवणूक मर्यादा जाणून घ्या...
कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त हजारच्या पटीमध्ये कितीही गुंतवणूक करता येईल. या बाँड्सचा अवधी 7 वर्षांचा असतो. वरिष्ठ नागरिकांना मुदतपूर्व बॉन्ड परत करण्याची मुभा आहे. दरवर्षी 1 जुलै आणि 1 जानेवारीला या व्याजदरामध्ये बदल केला जाणार आहे. व्याजाची रक्कम गुंतवणूकदाराच्या खात्यामध्ये ड्यूच्या दिवशीच वळती केली जाणार आहे. हा करमुक्त बॉन्ड नाहीय. त्यामुळे कर आकारला जाणार आहे. तसेच टीडीएसही कापला जाणार आहे. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

OMG! पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसरीचाच; तरुणीला तीन दिवस कोरोना बाधितांसोबत 'डांबले'

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला दुसरा मोठा झटका देणार; शिवराजसिंहांचीही डोकेदुखी वाढणार

खिंडीत गाठले! भारताने चीनच्या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवले; ड्रॅगनचा श्वास कोंडला

ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार'

आता नितीन गडकरी उतरले मैदानात; चिनी कंपन्यांना दणका देण्याचा जबरदस्त 'हायवे प्लॅन' तयार

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

तब्बल 40000 रुपयांनी स्वस्त झाला आयफोन; जाणून घ्या किंमत

Web Title: Central government Will pay more interest than FD; new floating bond scheme launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.