केंद्र सरकार 'या' 3 मोठ्या कंपन्यांमधील हिस्सा विकणार, 16500 कोटी रुपये उभारण्याची योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 19:43 IST2022-11-25T19:42:52+5:302022-11-25T19:43:16+5:30
उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विकण्याचा विचार करत आहे.

केंद्र सरकार 'या' 3 मोठ्या कंपन्यांमधील हिस्सा विकणार, 16500 कोटी रुपये उभारण्याची योजना
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकार कोल इंडिया, हिंदुस्थान झिंक आणि राष्ट्रीय केमिकल्समधील 5 ते 10 हिस्सा विकू शकते. महसूल वाढवण्याच्या उद्देशाने हा भाग आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत विकला जाईल, असे अहवालात म्हटले आहे.
किती रुपये उभारणार
अहवालात असे म्हटले आहे की, सध्याच्या पातळीवर या कंपन्यांमधील 5 टक्के हिस्सेदारी विकूनही सरकारला 2 अब्ज डॉलर किंवा 16500 कोटी रुपये मिळू शकतात. मात्र, यासंदर्भात सरकार किंवा कोणत्याही कंपनीकडून कोणतेही अधिकृत विधान किंवा माहिती समोर आलेली नाही. तसेच या वृत्तांची पुष्टीही झालेली नाही.
या कंपन्यातील स्टेक विकणार
रिपोर्टनुसार, सरकारच्या स्टेक सेल प्लॅनमध्ये विक्रीसाठी 4 ऑफर्स समाविष्ट आहेत. यामध्ये कोल इंडिया, एनटीपीसी, हिंदुस्थान झिंक आणि आरआयटीईएस यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार नॅशनल केमिकल्स फर्टिलायझर आणि नॅशनल फर्टिलायझरमधील 10 ते 20 टक्के स्टेक विकू शकते. आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणासाठी मार्चपर्यंत निविदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे.
अॅक्सिसमधील हिस्सा विकला
पुढील आर्थिक वर्षात विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. सरकारने गेल्या आठवड्यात आयडीबीआय बँकेतील एकूण 60.72 टक्के हिस्सेदारी विकून बँकेचे खाजगीकरण करण्यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांकडून बोली मागवली. अलीकडेच, सरकारने अॅक्सिस बँकेतील 1.5 टक्के हिस्सा विकून 3839 कोटी रुपये उभे केले. सरकारने हा स्टेक स्पेशलाइज्ड अंडरटेकिंग ऑफ द युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (SUUTI) मार्फत ठेवला होता.