मोठा निर्णय : केंद्र सरकार ५० ठिकाणी मॉड्युलर हॉस्पिटल उभारणार, महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 12:17 PM2021-06-14T12:17:33+5:302021-06-14T12:18:22+5:30

Central Government News: कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी देशात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुढच्या दोन-तीन महिन्यांत देशातील विविध भागात ५० इनोव्हेटिव्ह मॉड्युलर रुग्णालये उभारण्याची तयारी केली आहे.

Central government will set up modular hospitals in 50 places, including these cities in Maharashtra | मोठा निर्णय : केंद्र सरकार ५० ठिकाणी मॉड्युलर हॉस्पिटल उभारणार, महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश

मोठा निर्णय : केंद्र सरकार ५० ठिकाणी मॉड्युलर हॉस्पिटल उभारणार, महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोना विषाणू विरोधातील लढाई देशात सुरू आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी देशात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुढच्या दोन-तीन महिन्यांत देशातील विविध भागात ५० इनोव्हेटिव्ह मॉड्युलर रुग्णालये उभारण्याची तयारी केली आहे. टाइम्स अॉफ इंडिया च्या एका रिपोर्टनुसार सध्या असलेल्या रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी ही मॉड्युलर रुग्णालये  सध्या असलेल्या रुग्णालयांच्या बाजूला पायाभूत सुविधांच्या विस्तारित रूपात तयार केले जाईल. (Central government will set up modular hospitals in 50 places, including these cities in Maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार आयसीयूसोबत १०० बेडसह अशी ५० मॉड्युलर रुग्णालये तयार केली जातील. तीन आठवड्यात उभारणी होणाऱ्या या रुग्णालयांना बनवण्यासाठी ३ कोटी रुपये एवढा अंदाजित खर्च येईल. तर ६-७ आठवड्यात ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होतील. पहिल्या टप्प्यात बिलासपूर, अमरावती, पुणे, जालना आणि मोहाली येथे १०० बेड मॉड्युलर रुग्णालये बनतील. रायपूर येथे २० बेड असलेले रुग्णालय बनेल. तर बंगळुरू येथे २०, ५० आणि १०० बेडचे एक एक रुग्णालय तयार होईल. 

ही रुग्णालये २५ वर्षांपर्यंत कार्यरत राहतील. या रुग्णालयांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ती एका आठवड्याच्या आत गुंडाळून अन्य कुठल्याही ठिकाणी नेता येतील. 

देशातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यावर रुग्णालयातील पायाभूत सुविधांवर खूप दबाव आला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत अभिनव मॉड्युलर रुग्णालय दिलासा घेऊन आले आहे. मॉड्युलर रुग्णालय हे रुग्णालयाच्या पायाभूत रचनेचा विस्तार असेल. ते रुग्णालयाच्या जवळ बनवता येऊ शकेल.

Web Title: Central government will set up modular hospitals in 50 places, including these cities in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.