केंद्र सरकारची धडक कारवाई; चुकीचा कंटेट प्रसारित करणारे 73 ट्विटर हँडल आणि 4 यूट्यूब चॅनेल केले ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 10:30 AM2022-01-11T10:30:07+5:302022-01-11T10:30:21+5:30

ब्लॉक केलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मंत्रिमंडळ बैठकीशी संबंधित प्रक्षोभक कंटेट प्रकाशित केल्याचा आरोप आहे.

Central government's action; Blocked 73 Twitter handles and 4 YouTube channels that broadcast incorrect content | केंद्र सरकारची धडक कारवाई; चुकीचा कंटेट प्रसारित करणारे 73 ट्विटर हँडल आणि 4 यूट्यूब चॅनेल केले ब्लॉक

केंद्र सरकारची धडक कारवाई; चुकीचा कंटेट प्रसारित करणारे 73 ट्विटर हँडल आणि 4 यूट्यूब चॅनेल केले ब्लॉक

Next

नवी दिल्ली: आयटी मंत्रालयाने ट्विटर आणि यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या काही चॅनेल आणि हँडल्सवर कारवाई केली आहे. बनावट मंत्रिमंडळ बैठकीशी संबंधित प्रक्षोभक साहित्य प्रकाशित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तक्रार केल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही सरकारने मोठ्या प्रमाणात यूट्यूब चॅनेल ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मंत्रालयाने 73 ट्विटर हँडल, चार यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामवरील एका गेमवर कारवाई केली आहे. ही हँडल पाकिस्तानशी जोडलेली असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. तसेच याबाबत मंत्री चंद्रशेखर यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रक्षोभक व्हिडिओची माहिती सर्वप्रथम चंद्रशेखर यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली होती, जिथे एका वापरकर्त्याने त्यांना पंतप्रधान दर्शविणाऱ्या अत्यंत हिंसक व्हिडिओवर कारवाई करण्याची विनंती केली होती.

चंद्रशेखर म्हणाले की, 'बनावट आणि हिंसक' व्हिडिओ डिसेंबर 2020 पासून सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. युझरच्या विनंतीला प्रतिसाद देत मंत्री म्हणाले की, त्यावर काम सुरू आहे. त्यांनी नंतर सांगितले की, सुरक्षित आणि विश्वसनीय इंटरनेटवरील टास्क फोर्सने या प्रकरणावर काम केले आहे. ट्विटर, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर बनावट/दाहक कंटेट शेअर करण्याचा प्रयत्न करणारी हँडल ब्लॉक करण्यात आली आहेत आणि त्यांच्या मालकांची ओळख पटली आहे.'

तीन आठवड्यांपूर्वीही कारवाई करण्यात आली होती

21 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी गुप्तचर संस्थांसोबत समन्वयित प्रयत्नात 20 यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन भारतविरोधी प्रचार केला जात होता. मंगळवारी एका निवेदनात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की, चॅनेल आणि वेबसाइट पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या नेटवर्कशी संबंधित आहेत आणि भारताशी संबंधित विविध संवेदनशील विषयांबद्दल खोट्या बातम्या पसरवत आहेत. 

Web Title: Central government's action; Blocked 73 Twitter handles and 4 YouTube channels that broadcast incorrect content

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.