१२वीच्या परीक्षेबाबत २ दिवसांत निर्णय; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 06:25 AM2021-06-01T06:25:57+5:302021-06-01T06:27:00+5:30
सीबीएसई, आयसीएसई यंदा परीक्षा घेणार असेल तर त्यामागची कारणमीमांसा केंद्राने गुरुवारी स्पष्ट करावी असा आदेश खंडपीठाने दिला.
नवी दिल्ली : सीबीएसईने यंदा १२ वीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याविषयी येत्या दोन दिवसांत केंद्र सरकार ठोस निर्णय घेईल असे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. आता या खटल्याची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.
सीबीएसई, आयसीएसई यंदा परीक्षा घेणार असेल तर त्यामागची कारणमीमांसा केंद्राने गुरुवारी स्पष्ट करावी असा आदेश खंडपीठाने दिला.
गेल्या वर्षी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने परीक्षा घेतल्या नव्हत्या. मात्र यंदा ते आपल्या धोरणात बदल करणार असतील तर त्यामागची ठोस कारणे केंद्र सरकारने न्यायालयाला सादर करावीत असेही म्हटले आहे. कोरोनामुळे यंदा परीक्षा न घेता आधीच्या इयत्तांतील गुणांच्या आधारे १२वीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.