NEET PG 2021 परीक्षा पुढे ढकलली; केंद्र सरकारचा निर्णय, लवकरच नवी तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:40 PM2021-04-15T20:40:07+5:302021-04-15T20:41:57+5:30

NEET PG 2021: येत्या रविवारी १८ एप्रिल रोजी ही परीक्षा देशभर होणार होती.

central govt declares that neet pg 2021 exam postponed and next date to be decided later | NEET PG 2021 परीक्षा पुढे ढकलली; केंद्र सरकारचा निर्णय, लवकरच नवी तारीख

NEET PG 2021 परीक्षा पुढे ढकलली; केंद्र सरकारचा निर्णय, लवकरच नवी तारीख

googlenewsNext
ठळक मुद्देNEET PG 2021 परीक्षा लांबणीवरकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहितीनवीन तारीख लवकरच जाहीर करणार

नवी दिल्ली: देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नीट पीजी (NEET PG 2021) ही राष्ट्रीय परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या रविवारी १८ एप्रिल रोजी ही परीक्षा देशभर होणार होती. केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला असून, पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. (central govt declares that neet pg 2021 exam postponed and next date to be decided later) 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली. तरुण वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. बुधवार, १५ एप्रिल रोजी NEET PG 2021 परीक्षेचे अॅडमिट कार्ड जाहीर करण्यात आले होते.

नवीन तारीख लवकरच जाहीर करणार

NEET PG 2021 परीक्षेच्या आयोजनाच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली होती. कोरोना सुरक्षेसंबंधी गाईडलाइन्सदेखील जारी झाल्या होत्या. परंतु, देशभरात करोना संसर्गाची स्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. एकामागोमाग एक परीक्षा स्थगित केल्या जात असून, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता.

“कोरोना झाल्यानंतर सचिन तेंडुलकरांनी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नव्हती”

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही लांबणीवर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा आता जून महिन्यात होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.
 

Web Title: central govt declares that neet pg 2021 exam postponed and next date to be decided later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.