आता एक नाही, दोन महिन्यांनी कोव्हिशिल्डचा दुसरा डोस; केंद्राचे राज्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 04:45 PM2021-03-22T16:45:26+5:302021-03-22T16:48:46+5:30
corona vaccination: केंद्र सरकारने सर्व राज्यांना अत्यंत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहे.
नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन मंजुरी दिल्यानंतर संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाचा (corona vaccination) दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अत्यंत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहे. यानुसार कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा दुसरा डोस दोन महिन्यांनी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. (central govt directs all states that to provide 2nd dose of COVISHIELD at 4 to 8 weeks interval)
केंद्राने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना लसीकरणासंदर्भात नवीन सूचना केल्या आहेत. यानुसार, कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा दुसरा डोस सुमारे ४ ते ८ आठवड्यांनी द्यावा. यापूर्वी कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांच्या अंतराने दिला जात असे. आता मात्र, कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील काळ वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
In view of emerging scientific evidence, interval between two doses of a specific COVID-19 vaccine i.e. COVISHIELD, has been revisited by National Technical Advisory Group on Immunization& subsequently by National Expert Group on Vaccine Administration for COVID-19: Govt of India
— ANI (@ANI) March 22, 2021
NTAGI च्या अभ्यासानंतर निर्णय
NTAGI आणि कोरोना लसीकरणावर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या पथकाने यावर केलेल्या अभ्यासानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा दुसरा डोस ४ ते ८ आठवड्यादरम्यान दिल्यास तो अधिक प्रभावी आणि लाभदायक ठरू शकतो, असा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या निर्देशांचे पालन करावी, अशी सूचना केंद्राकडून करण्यात आली आहे.
केवळ कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन नाही
केंद्र सरकारच्या या सूचना केवळ कोव्हिशिल्ड कोरोना लसीसाठी असून, कोव्हॅक्सिन कोरोना लसीचा डोस हे आधी ठरलेल्या निकषांप्रमाणेच द्यायचे आहेत, असेही केंद्राने जारी केलेल्या निर्देशांमध्ये म्हटले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीचा वापर जास्त प्रमाणात देशातील कोरोना लसीकरणासाठी केला जात असून, ही कोरोना लस अनेक बाहेरील देशांनाही पुरवण्यात आली आहे.
बंगाली जनतेसमोर TMC-BJP कडून स्वप्नांचं गाठोडं; कुणाच्या आश्वासनांत किती दम? तुम्हीच पाहा
दरम्यान, १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ भारतात करण्यात आला. त्यानंतर १ मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, ६० वर्षांवरील व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते, मंत्री, दिग्गज व्यक्तींना कोरोना लस घेतली आहे.