गुड न्यूज! ड्रायव्हिंग लायसन्स, RC, PUC साठीची मुदत वाढवली; वाहनधारकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 05:52 PM2021-03-27T17:52:31+5:302021-03-27T17:54:48+5:30

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

central govt extends validity of driving licence and vehicle documents till month of june | गुड न्यूज! ड्रायव्हिंग लायसन्स, RC, PUC साठीची मुदत वाढवली; वाहनधारकांना दिलासा

गुड न्यूज! ड्रायव्हिंग लायसन्स, RC, PUC साठीची मुदत वाढवली; वाहनधारकांना दिलासा

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णयवाहनधारकांना मोठा दिलासावाहन कागदपत्रांसाठी मुदतवाढ

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमालीने वाढत असून, अनेक ठिकाणी गतवर्षीप्रमाणे लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी  पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. (central govt extends validity of driving licence and vehicle documents till month of june) 

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी करोनामुळे लॉकडाउन लागल्यापासून मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने अनेकदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 

१९७१ मध्ये मोदींना कोणत्या कायद्याखाली अटक झाली? ते कोणत्या तुरुंगात होते? RTI दाखल

वाहनधारकांना मोठा दिलासा

ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पीयूसी यांच्या नूतनीकरणाची चिंता असणाऱ्या अनेक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC किंवा इतर कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे किंवा ३१ मार्च २०२१ रोजी संपणार आहे, अशांसाठी ही मुदतवाढ आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

दरम्यान, ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आता कठीण टेस्ट पास करणे आवश्यक असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत याबाबतची माहिती दिली. ६९ टक्के मिळवणाऱ्यांनाच ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार आहे. विना हेल्मेट चालकांसाठी मंत्रालयाकडून एक नवं सिस्टम सुरू करण्यात येणार आहे. 
 

Web Title: central govt extends validity of driving licence and vehicle documents till month of june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.