CoronaVirusVaccination: मोठी बातमी! खासगी रुग्णालयात कोरोना लशीच्या एका डोससाठी द्यावे लागणार 250 रुपये - केंद्र सरकार
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 27, 2021 07:49 PM2021-02-27T19:49:20+5:302021-02-27T19:49:29+5:30
आता खासगी रुग्णालयांतून करण्यात येणाऱ्या लसिकरणासंदर्भातही चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने शनिवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की कोरोना लसिकरण केंद्र म्हणून काम करणाऱ्या खासगी रुग्णालयांत प्रति व्यक्ती प्रती डोससाठी 250 रुपये घेतले जातील. (covid 19 vaccine in private hospitals)
नवी दिल्ली - देशातील सरकारी रुग्णालयांत कोरोना लसिकरण मोफत होईल, असे सरकारने पूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, आता खासगी रुग्णालयांतून करण्यात येणाऱ्या लसिकरणासंदर्भातही चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने शनिवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की कोरोना लसिकरण केंद्र म्हणून काम करणाऱ्या खासगी रुग्णालयांत प्रति व्यक्ती प्रती डोससाठी 250 रुपये घेतले जातील. (Central govt fixed price of covid 19 vaccine in private hospitals costs Rs 250 per person per dose)
केंद्र सरकारच्या निर्णयापूर्वीच गुजरात सरकारने खासगी रुग्णालयांसाठी लशीच्या डोसची किंमत निश्चित केली होती. यानुसार, येथील खासगी रुग्णालयांतही कोरोनाचा डोस 250 रुपयांना मिळणार आहे. तर सरकारी रुग्णालयात हा डोस मोफत मिळेल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यांपैकी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,488 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान 113 रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात 11 लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस
अॅपवर द्या वयाचा पुरावा -
देशातील ६० वर्षांवरील सर्वांना व व्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील लोकांना १ मार्चपासून कोरोना लस देण्यात येणार आहे. मात्र लस घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रथम ‘को-विन’ अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून नावाची नोंदणी करावी लागेल. या वयोगटातील लोकांना लस देण्यासाठी देशात ३० हजार केंद्रे आहेत. त्यापैकी १० हजार सरकारी केंद्रांत मोफत लस दिली जाणार आहे.