Corona Vaccination: कोरोना लसीकरणाचे नियम बदलले! नव्या गाइडलाइन्स जारी; आता बुस्टर डोस कधी घ्यायचा? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 01:20 PM2022-01-22T13:20:18+5:302022-01-22T13:21:32+5:30

Corona Vaccination: केंद्राकडून आता बुस्टर डोसबाबतही मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत.

central govt issued new guidelines for corona vaccination now vaccine will be taken three months after recovery from corona | Corona Vaccination: कोरोना लसीकरणाचे नियम बदलले! नव्या गाइडलाइन्स जारी; आता बुस्टर डोस कधी घ्यायचा? पाहा

Corona Vaccination: कोरोना लसीकरणाचे नियम बदलले! नव्या गाइडलाइन्स जारी; आता बुस्टर डोस कधी घ्यायचा? पाहा

Next

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाची (Coronavirus) स्थिती गंभीर होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. इतकेच नव्हे, तर कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्णही वाढत आहेत. यावर कोरोना लसीकरण हाच रामबाण उपाय असल्यामुळे देशभरात यावर भर दिला जात आहे. यातच केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination) नव्या गाइडलाइन्स जारी केल्या असून, त्यामध्ये बुस्टर डोसबाबतही मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत. 

केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर नागरिकांनी तीन महिन्यांनंतर कोरोनाची लस घ्यायची आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी दिली आहे. कोरोनाची लागण आढळलेल्यांच्या लसीकरणात तीन महिन्यांचा विलंब होईल. त्यात 'बूस्टर' डोसचा देखील समावेश आहे, असे सांगितले जात आहे. 

तीन महिन्यांनी बरे झाल्यानंतर डोस देण्यात येईल

कोरोना संसर्गाची चाचणी पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना आता तीन महिन्यांनी बरे झाल्यानंतर डोस देण्यात येईल, असे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी म्हटले आहे. तसेच शील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याची दखल घेण्याची विनंती केली आहे.

देशात पुन्हा एकदा लसीकरणाला वेग

कोरोना ओमायक्रॉन व्हेरिएंट आल्यानंतर देशात पुन्हा एकदा लसीकरणाला वेग आला आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकारकडून अनेक माध्यमातून जनजागृती केली जात आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात लसीकरणाबाबत अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. आयसीएमआरचे डीजी बलराम भार्गव यांनी लोकांच्या मनातील प्रश्नाबाबत माहिती दिली आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुमारे नऊ महिने अँटीबॉडी असते. लसीपासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीवर भारतात एक अभ्यास झाला आणि जागतिक स्तरावरही संशोधन झाले. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की अँटीबॉडी शरीरात सुमारे नऊ महिने टिकते, असे ते म्हणाले. 

दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांत ३ लाख ३७ हजार ७०४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ४८८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, २ लाख ४२ हजार ६७६ जण कोरोनामधून बरे झाले आहेत. याशिवाय १० हजार ५० ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
 

Web Title: central govt issued new guidelines for corona vaccination now vaccine will be taken three months after recovery from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.