Corona Vaccine: कोविशिल्ड की कोवॅक्सिन? सर्वसामान्यांना लस निवडता येणार?; जाणून घ्या...

By कुणाल गवाणकर | Published: January 12, 2021 05:26 PM2021-01-12T17:26:50+5:302021-01-12T17:37:55+5:30

देशात कोरोशिल्ड, कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी

central health secretary clarifies about does citizen have choice between covishield and covaxin | Corona Vaccine: कोविशिल्ड की कोवॅक्सिन? सर्वसामान्यांना लस निवडता येणार?; जाणून घ्या...

Corona Vaccine: कोविशिल्ड की कोवॅक्सिन? सर्वसामान्यांना लस निवडता येणार?; जाणून घ्या...

googlenewsNext

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. काल दिवसभरात देशात १३ हजारांहून कमी रुग्ण आढळून आले. त्यामुळे देश लवकरच कोरोना संकटातून बाहेर पडू लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यातच आता कोरोना लसीकरणाची तयारीदेखील वेगानं सुरू झाली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून देशातल्या विविध राज्यांमध्ये कोरोनाची लस पाठवली गेली आहे. 

पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्सना कोरोनावरील लस देण्यात येईल. त्यानंतर पन्नाशी पार केलेल्या, गंभीर आजारांचा सामना करत असलेल्यांना लस टोचण्यात येईल. सध्याच्या घडीला सीरमच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. दोन्ही लसी भारतातच तयार झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांनादेखील याच लसी मिळतील. 




कोविशील्ड, कोवॅक्सिन यापैकी कोणती लस घ्यायची याचा पर्याय लाभार्थ्याना असेल का, त्यांना दोनपैकी एका लसीची निवड करण्याचं स्वातंत्र्य असणार का, असे प्रश्न आज झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांना विचारण्यात आले. 'बऱ्याच देशांमध्ये एकापेक्षा जास्त लसी वापरल्या जात आहेत. मात्र तिथे लाभार्थ्याला असा पर्याय देण्यात आलेला नाही,' असं भूषण म्हणाले. त्यामुळे भारतातही लाभार्थ्याला लसीची निवड करता येणार नाही, अशी दाट शक्यता आहे.




देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लसीकरणाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल उपस्थित होते. 'कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेबद्दल कोणतीही शंका नाही. हजारो नागरिकांवर त्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यात आढळून आलेले साईड इफेक्ट्स अतिशय कमी आहेत,' असं पॉल म्हणाले. यावेळी त्यांनी कोरोनावरील लस तयार केल्याबद्दल सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकचे आभार मानले.

Read in English

Web Title: central health secretary clarifies about does citizen have choice between covishield and covaxin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.