केंद्रीय गृहखात्याचे संकेतस्थळ हॅक
By admin | Published: February 12, 2017 03:12 PM2017-02-12T15:12:43+5:302017-02-12T15:12:43+5:30
सायबर हॅकर्सनी आज सकाळी केंद्रीय गृहखात्याची वेबसाइट हॅक केल्याने खळबळ उडाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - सायबर हॅकर्सनी आज सकाळी केंद्रीय गृहखात्याची वेबसाइट हॅक केल्याने खळबळ उडाली आहे. वेबासाइट हॅक झाल्याचे समोर येताच राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने ही वेबसाइट ब्लॉक केली आहे.
आज सकाळपासून गृहखात्याच्या www.mha.nic.in या संकेतस्थळावर गेल्यास ही साइट बंद असल्याचे दिसत होते. ही साइट हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याने ही साइट तात्पुरती बंद करण्यात आली. वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याने सायबर सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, हे संकेतस्थळ हॅक करण्यामागे पाकिस्तानी हॅकर्सचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Officials are working on MHA's website, it has been temporarily blocked for now: MHA
— ANI (@ANI_news) February 12, 2017