भारत-चीन तणाव : लडाखमध्ये अशी आहे भारताची तयारी; जवानांनी बनवला VIDEO, ड्रॅगनला प्रत्युत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:59 PM2020-06-08T14:59:03+5:302020-06-08T15:10:44+5:30
व्हिडिओमध्ये लडाखमध्ये टँकपासून ते पायदळ सैन्याची कशी तयारी आहे, हेही दाखवण्यात आले आहे. याचाच अर्थ भारतीय जवानांसाठीही कोणतेही लक्ष अवघड नाही. खरेतर हा व्हिडिओ शत्रूसाठी इशारा आहे.
नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनसोबत तणाव सुरू असतानाच भारतीय लष्कर पूर्णपणे सतर्क आणि तयार आहे. चीन गेल्या काही दिवसांपासून सीमेवरील आपल्या सैनिकांच्या तयारीचा व्हिडिओ जारी करत आहे. अशातच आता, केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लद्दाखमधील भारतीय जवानांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. ध्रुव वॉरियर्स नावाच्या या व्हिडिओमध्ये भारताची संपूर्ण तयारी दिसत आहे. या व्हिडिओमध्ये भारताच्या भू-दल, नौ-दल आणि हवाई-दलाची तयारी दिसत आहे. भारताचा हा व्हिडिओ म्हणजे चीनला दिलेले चोख उत्तर मानले जात आहे.
व्हिडिओमध्ये भारतीय जवानांची तयारी -
केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर जारी केलेल्या या 2 मिनिट 4 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये भारतीय जवानांची आकाशापासून जमिनिवरीची तयारी आणि प्रशिक्षण दाखवण्यात आले आहे. एवढेच नाही, तर रात्रीही अत्यंत दुर्गम भागांत भारतीय जवान कशा प्रकारे काम करतात हेही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'
टँक ते पायदळ, भारताची जबरदस्त तयारी -
व्हिडिओमध्ये लडाखमध्ये टँकपासून ते पायदळ सैन्याची कशी तयारी आहे, हेही दाखवण्यात आले आहे. याचाच अर्थ भारतीय जवानांसाठीही कोणतेही लक्ष अवघड नाही. खरेतर हा व्हिडिओ शत्रूसाठी इशारा आहे.
कोणत्याही प्रकारच्या युद्धासाठी तयार -
व्हिडिओमध्ये जवानांचे युद्धासंदर्भातील सर्वप्रकारचे प्रशिक्षण दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये जवान हेलिकॉप्टरमधून उड्या घेतानाही दाखवण्यात आले आहेत.
This inspiring and breathtaking video of Indian Army (@adgpi), who are securing our borders in the northern part of Ladakh is a must watch. pic.twitter.com/1le8vltPXS
— G Kishan Reddy (@kishanreddybjp) June 8, 2020
Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अॅडव्हान्स्ड' व्हॅक्सीन
हा व्हिडिओ म्हणजे चीनला प्रत्युत्तर -
हा व्हिडिओ म्हणजे चीनला प्रत्युत्तर असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने चीनी सैन्याचा टँकसह सुरू असलेल्या युद्धाभ्यासाचा व्हिडिओ जारी केला होता. पीएलएच्या या व्हिडिओमध्ये चीनी सैनिक आपल्या टँकसह एका पहाडावर युद्धसराव करत होते.
केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं