आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं अभिनंदन; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट, नंतर डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:03 PM2019-06-10T22:03:28+5:302019-06-10T22:18:53+5:30

नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ...

central minister Harsh Vardhan congratulates Sushma Swaraj on her appointment as Andhra Pradesh Governor delete tweets later | आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं अभिनंदन; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट, नंतर डिलीट

आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं अभिनंदन; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट, नंतर डिलीट

Next

नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं. हर्षवर्धन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये राज्यपाल झाल्याबद्दल स्वराज यांचं अभिनंदन केलं. मात्र थोड्याच वेळात त्यांनी ट्विट डिलीट केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. स्वराज या मोदी सरकार 1 मध्ये परराष्ट्र मंत्री होत्या. मात्र त्यांना मोदी सरकार 2 मध्ये मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. 







'भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माझ्या ताई, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्वच क्षेत्रात तुम्हाला असलेल्या अनुभवाचा जनतेला फायदा होईल,' असं हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटलं. स्वराज यांच्या नियुक्तीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना हर्षवर्धन यांनी हे ट्विट केलं. सध्या ईसीएल नरसिम्हन आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे तेलंगणाचीदेखील जबाबदारी आहे. 

Web Title: central minister Harsh Vardhan congratulates Sushma Swaraj on her appointment as Andhra Pradesh Governor delete tweets later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.