केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू संसदेत पोहोचले

By admin | Published: February 25, 2016 11:46 AM2016-02-25T11:46:59+5:302016-02-25T11:54:45+5:30

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयातून संसदेकडे रवाना झाले आहेत.

Central Railway Minister Suresh Prabhu reached the Parliament | केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू संसदेत पोहोचले

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू संसदेत पोहोचले

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली., दि. 25 - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला रेल्वे अर्थसंकल्प थोडयाच वेळात सादर होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयातून संसदेकडे रवाना झाले आहेत.
दुपारी 12 वाजता प्रभू रेल्वे अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात करणार आहेत. मुंबईसह संपूर्ण देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मुंबईसह सर्वच प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पाकडून भरपूर अपेक्षा आहेत. रेल्वेचा प्रवास महागणार की तेवढाच राहणार? मालवाहतूक महाग होणार की स्वस्त? नवीन रेल्वेमार्ग कुठले होणार नी त्यात महाराष्ट्राच्या पदरात काही पडणार की महाराष्ट्र वंचित राहणार? प्रचंड गर्दीनं त्रस्त असलेल्या मुंबईकर प्रवाशांचा प्रवास सुसह्य होणार की आहे तसाच गर्दीचा राहणार या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे थोड्याच वेळात सुरेश प्रभूंच्या बजेट सादरीकरणानंतर उलगडणार आहेत.

Web Title: Central Railway Minister Suresh Prabhu reached the Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.