अभिनेत्री कंगना राणौतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 11:51 AM2020-09-07T11:51:29+5:302020-09-07T12:17:16+5:30
शिवसेना आणि कंगना राणौतमध्ये वाकयुद्ध रंगल असताना केंद्राचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई: अभिनेत्री कंगना राणौतला केंद्रीय गृहमंत्रालयानं वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं कंगना शिवसेनेच्या निशाण्यावर आहे. कंगनाला शिवसेनेकडून थेट इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर कंगनानंदेखील शिवसेनेला प्रतिआव्हान दिलं आहे. ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय. हिंमत असेल तर अडवून दाखवा, अशा शब्दांत कंगनानं आव्हान दिल्यानं वातावरण तापलंय. त्या पार्श्वभूमीवर केंद्रानं कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
Centre approves ‘Y’ level security for actor #KanganaRanaut: Sources pic.twitter.com/YKmHKGE3mZ
— ANI (@ANI) September 7, 2020
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिल्याचं कंगनानं म्हटलं होतं. त्यानंतर कंगनानं ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान शिवसेनेला दिलं. त्यामुळे आता केंद्रानं कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर कंगनानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले. 'सध्याच्या परिस्थिती पाहता काही दिवस मुंबईला जाऊ नको, असा सल्ला अमित शहाजी देऊ शकले असते. मात्र त्यांनी भारताच्या एका कन्येला दिलेल्या शब्दाचा मान राखला. आमच्या स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची लाज राखली. जय हिंद!,' अशा शब्दांत कंगनानं शहांचे आभार मानले.
ये प्रमाण है की अब किसी देशभक्त आवाज़ को कोई फ़ासीवादी नहीं कुचल सकेगा,मैं @AmitShah जी की आभारी हूँ वो चाहते तो हालातों के चलते मुझे कुछ दिन बाद मुंबई जाने की सलाह देते मगर उन्होंने भारत की एक बेटी के वचनों का मान रखा, हमारे स्वाभिमान और आत्मसम्मान की लाज रखी, जय हिंद 🙏 https://t.co/VSbZMG66LT
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 7, 2020
संजय राऊत यांच्या त्या विधानामुळे गुजरात भाजपासह, काँग्रेसही संतप्त, अल्पेश ठाकोर यांनी दिली तोंड काळं करण्याची धमकी
तत्पूर्वी काल हिमाचल प्रदेश सरकारनं कंगनाला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. याबद्दलची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली आहे. याबद्दलच्या सूचना राज्याच्या डीजीपींना दिल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं. कंगनानं काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेश सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. कंगनाला सुरक्षा पुरवण्यासाठी तिच्या वडिलांनी डीजीपींनी पत्र लिहिल्याची माहिती ठाकूर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. 'कंगनाच्या बहिणीनं काल मला फोन केला होता. तिला ९ सप्टेंबरला मुंबईला जायचं आहे. कंगनाला मुंबई दौऱ्यात सुरक्षा देण्याचा विचार सुरू आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशची कन्या आहे. त्यामुळे तिच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे,' असं ठाकूर म्हणाले.
कंगना रनौतने एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनला कोकेन घेण्यास सांगितलं होतं? जाणून घ्या नेमका काय होता आरोप...
मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा; कंगनाचे खुले आव्हान
"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.
'कंगनासारखे 'उपरे' आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी!' नितेश राणेंचा शिवसेनेला टोला
काय म्हणाले संजय राऊत?
कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरला.
शिवसेनेकडून छ. शिवाजी महाराजांचा अपमान; काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना सुनावलं
काय आहे प्रकरण?
अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशारा
कंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला होता.