रमजानच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात कारवाई नाही; केंद्राचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 04:32 PM2018-05-16T16:32:14+5:302018-05-16T16:32:14+5:30
सर्वसामान्य लोकांसाठी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्राकडे ही मागणी केली होती.
नवी दिल्ली - रमजानवेळी काश्मीरमध्ये आतिरेक्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. रमजानच्या महिन्यात दहशातवादाविरोधात कोणतीही शोधमोहिम न करण्याचा आदेश आज केंद्र सरकारने दिला आहे. सर्वसामान्य लोकांसाठी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्राकडे ही मागणी केली होती.
रमजानच्या महिन्यामध्ये दहशतवाद्याविरोधात कोणतेही ऑपरेशन लॉन्च न करणयाचे आदेश केंद्र सरकारने सुरक्षा दलाला आदेश दिले आहेत. पण जर समोरुन दहशतवाद्यांकडून कारवाई झाली तर निर्दोष लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रतिहल्ला करण्याचा सुट भारतीय जवानांना देण्यात आली आहे.
Centre asks security forces not to launch operations in J&K during the month of Ramzan. Security forces to reserve the right to retaliate if attacked or if essential to protect the lives of innocent people: Ministry of Home Affairs pic.twitter.com/DgnQO9kQTm
— ANI (@ANI) May 16, 2018