केंद्र सरकारने 14 मेसेंजर अॅप्सवर घातली बंदी, दहशतवादी पाकमधून मेसेज पाठवण्यासाठी करत होते वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 11:04 AM2023-05-01T11:04:07+5:302023-05-01T11:23:50+5:30
दहशतवादी या मोबाईल मेसेंजर अॅप्सचा वापर पाकिस्तानकडून मेसेज पसरवण्यासाठी आणि मेसेज प्राप्त करण्यासाठी केला होता.
नवी दिल्ली : केंद्र सरकारनेपाकिस्तानी अॅप्सविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने गुप्तचर संस्थेच्या (आयबी) इनपुटवरून पाकिस्तानमधून ऑपरेट केलेल्या 14 मेसेंजर अॅप्सवर बंदी घातली आहे. दहशतवादी या मोबाईल मेसेंजर अॅप्सचा वापर पाकिस्तानमधून मेसेज पसरवण्यासाठी आणि मेसेज प्राप्त करण्यासाठी करत होते.
दरम्यान, गुप्तचर संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानचे 14 मोबाइल मेसेंजर अॅप्लिकेशन ब्लॉक केले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत पसरवण्यासाठी या अॅप्सचा वापर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अॅप्लिकेशन्सचा वापर दहशतवाद्यांनी काश्मीरमधील त्यांचे समर्थक आणि ऑन ग्राउंड वर्कर्ससोबत संवाद साधण्यासाठी केला होता.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर संस्था ओव्हरग्राउंड वर्कर्स आणि दहशतवादी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरत असलेल्या चॅनेलवर लक्ष ठेवतात. संभाषणाचा मागोवा घेत असताना गुप्तचर संस्थांना असे आढळले की, मोबाईल अॅप्लिकेशनचे भारतात प्रतिनिधी नाहीत आणि त्यावरील घडामोडींचा मागोवा घेणे कठीण आहे.
Central Government blocks 14 mobile messenger apps. It is reported that terrorists used these mobile messenger apps to spread the message and receive messages from Pakistan.
— ANI (@ANI) May 1, 2023
राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, यानंतर खोऱ्यात कार्यरत असलेल्या इतर गुप्तचर संस्थांच्या मदतीने अशा अॅप्सची यादी तयार करण्यात आली, जे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात आणि भारतीय कायद्यांचे पालन करत नाहीत. यादी तयार झाल्यानंतर या मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्याची विनंती संबंधित मंत्रालयाला करण्यात आली.तसेच, माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत हे अॅप्स ब्लॉक करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
या अॅप्सवर बंदी
सूत्रांनी सांगितले की, या अॅप्समध्ये क्रायपव्हायझर, एनिग्मा, सेफस्विस, विकरमे, मीडियाफायर, ब्रायर, बीचॅट, नंदबॉक्स, कॉनिअन, आयएमओ, एलिमेंट, सेकेंड लाइन, जांगी, थ्रेमा इत्यादींचा समावेश आहे.