सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 10:30 PM2024-09-27T22:30:07+5:302024-09-27T22:41:37+5:30

आधार प्राधिकरणाने या वेबसाइट्सविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

Centre blocks websites leaking citizens’ Aadhaar and PAN details | सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 

सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 

नवी दिल्ली : आधार कार्ड आणि पॅन कार्डचा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स केंद्र सरकारने ब्लॉक केल्या आहेत. या वेबसाइट्स स्टार हेल्थचा लीक झालेला डेटा आपल्या वेबसाइट्सवर दाखवत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर आधार प्राधिकरणाने या वेबसाइट्सविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अलीकडेच, स्टार हेल्थच्या ३ कोटींहून अधिक लोकांचा वैयक्तिक डेटा लीक झाला आहे. 

स्टार हेल्थने हॅकर, टेलिग्राम आणि त्यात सामील असलेल्या इतरांविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. डेटा लीक थांबवणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण ते सहजपणे दुसऱ्या वेबसाइटवर अपलोड केले जाऊ शकते. तसेच,  VPN चा वापर करून ते पाहता येते. डेटा इतर चॅटबॉट्स आणि वेबसाइट्समध्ये प्रविष्ट केला जाऊ शकतो. नवीन डेटा संरक्षण कायदा अद्याप लागू झालेला नाही.

सरकारचे म्हणणे काय?
सुरक्षित इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. काही वेबसाइट्स देशातील नागरिकांचा आधार आणि पॅन कार्ड डेटा लीक करत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सरकार सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देते. या संदर्भात या वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

वेबसाइट्सवर काय आहे आरोप?
या वेबसाइट्सवर देशातील नागरिकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड डेटा लीक केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. डेटा लीकच्या या घटनेने लोकांची चिंता वाढली आहे.

हॅकर्सच्या निशाण्यावर भारतीय टेलिकॉम युजर्स
या वर्षी जानेवारीमध्ये असे समोर आले होते की, ७५ कोटी भारतीय टेलिकॉम युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना या प्रणालीचे ऑडिट करण्यास सांगितले होते. यामागे हॅकर्सकडे युजर्सचे फोन नंबर आणि आधार कार्ड यांसारख्या डिटेल्स असल्याचे समोर आले आहे.

सायबर सुरक्षा फर्म दावा काय होता?
CloudSEK (सायबर सुरक्षा फर्म) ने दावा केला होता की, हॅकर्सच्या एका गटाने भारतीय मोबाइल नेटवर्क ग्राहकांचा एक मोठा डेटाबेस विक्रीसाठी डार्क वेबवर ठेवला होता. त्यासाठी ते ३ हजार डॉलर्सची मागणी करत आहेत. डेटासेटमध्ये ८५ टक्के भारतीय युजर्सचा डेटा असू शकतो.

Web Title: Centre blocks websites leaking citizens’ Aadhaar and PAN details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.