Coronavirus In India : कंट्रोल रुम तयार करा, तात्पुरती रुग्णालये उभारा; वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं राज्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 10:44 AM2022-01-02T10:44:50+5:302022-01-02T10:45:30+5:30
Coronavirus In India : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहित वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे रुग्णवाढ.
देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलण्याची तयारी केली आहे. याशिवाय येत्या काळात आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठीही तयारी सुरू केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसाराचा तपास करण्यासाठी केंद्रानं शनिवारी राज्यासाठी एक अॅडव्हायझरी जारी केली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहित, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करण्यासाठी उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत.
आरोग्य सचिवांनी राज्यांना तात्पुरती रुग्णालये उभारण्याची प्रक्रिया सुरू करणं आणि या प्रकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी कंट्रोल रुम तयार करण्याची निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहे. यासोबतच जिल्हा स्तरावर नियंत्रण कत्ष स्थापन करणं आणि कोविड डेडिकेटेड हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरची समीक्षा करण्याचाही सल्ला दिला आहे.
Union Health Secretary Rajesh Bhushan writes to chief secretaries of all States/UTs on measures to deal with a possible surge in COVID cases; advises them to initiate process of setting up makeshift hospitals & constitute special teams to monitor patients in home isolation pic.twitter.com/NNWJiLsmon
— ANI (@ANI) January 1, 2022
अचानक रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. येत्या काळात हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चरवर यामुळे परिणाम होऊ शकतो. यामुळे तात्पुरती रुग्णालये फिल्ड स्तरावर उभारण्यात यावी. यासोबतच जिल्हा स्तरावर सर्व्हिलन्स सक्रिय करणं आवश्यक असल्याचंही पत्रात म्हटलं आहे.