केंद्र सरकारने भाजपच्या 32 नेत्यांची सुरक्षा काढली; ...म्हणून अमित शाह यांनी घेतला हा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:59 IST2025-02-27T18:54:11+5:302025-02-27T18:59:51+5:30
यात गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काही भाजप नेत्यांच्या नावाचाही समावेश होता...

केंद्र सरकारने भाजपच्या 32 नेत्यांची सुरक्षा काढली; ...म्हणून अमित शाह यांनी घेतला हा मोठा निर्णय
केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी (२६ फेब्रुवारी २०२५) पश्चिम बंगालमधील एकूण ३२ भाजप नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. खरे तर, गृह मंत्रालयाच्या समीक्षा समितीने यासंदर्भात एक यादी जाहीर केली होती, यात गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काही भाजप नेत्यांच्या नावाचाही समावेश होता.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, माजी केंद्रीय मंत्री जॉन बारला, माजी खासदार दशरथ तिर्की, बीजेपी नेते शंकुदेव पांडा आणि माजी आयपीएस अधिकारी देबाशीष धर आदीनेत्यांचा सुरक्षा हटवण्यात आलेल्या ३२ नेत्यांमध्ये समावेश आहे. महत्वाचे महणजे, तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार अभिषेक बनर्जी यांच्याकडून पराभूत झालेले डायमंड हार्बर भागातील उमेदवार अभिजीत दास, डायमंड हार्बरचे माजी आमदार दीपक हलदर, बोलपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पिया साहा आणि जंगीपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार धनंजय घोष आंदींचाही या यादीत समावे आहे.
काय म्हणाले अभिजीत दास? -
अभिजित दास म्हणाले, "मी हरिद्वारमध्ये आहे, यासंदर्भात मला कसलीही माहिती नाही. यासंदर्भात आपल्याकडे अद्याप कोणताही मेसेज आलेला नाही. खरे तर, ही एक नियमित प्रक्रिया आहे. केंद्रीय गृहमंत्रालय दर तीन महिन्याला अशा प्रकारची यादी जारी करत असते. त्यांचा एक प्रोटोकॉल आहे. ते पुन्हा सुरक्षा प्रदान करत असतात. गेल्या साडे सहा वर्षांत मी हे अनेक वेळा बघितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी २० जणांच्या नावांची अशी एक यादी आली होती. यानंतर पुन्हा अनेकांना सुरक्षा देण्यात आली."
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप खासदार तथा राज्य प्रवक्ते समिक भट्टाचार्य इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना म्हणाले, "ही एक नियमित प्रक्रिया आहे. सुरक्षिततेची आवश्यकता कुणाला आणि केव्हा आहे, हे केंद्र ठरवते आणि त्यानुसार सुरक्षा पुरवली जाते. यासंदर्भात राजकारण करण्यासारखे काहीही नाही.