कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याचा तूर्त विचार नाहीच; सरकारचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 05:55 AM2021-09-18T05:55:54+5:302021-09-18T05:56:43+5:30
जगभरात कोरोनाच्या दोन मात्र घेतल्यानंतरही बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू असली तरी भारतात मात्र तसा विचार सध्या तरी सुरू नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या दोन मात्र घेतल्यानंतरही बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू असली तरी भारतात मात्र तसा विचार सध्या तरी सुरू नाही. आता आम्ही प्रत्येक भारतीयाला कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्र देण्यावरच लक्ष केंद्रित केले आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे ते लक्ष्य पूर्ण झाल्यावर बूस्टर डोस देण्याचा कदाचित केंद्र सरकार विचार करू शकेल. अनेकांना दोन डोस देणे पुरेसे नाही. ते देऊनही त्यांच्यात कोरोना विषाणूचा सामना करण्याइतकी अँटीबॉडीज निर्माण होतील.
प्राधान्य कशाला?
- डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्येकाला दोन डोस दिले जाणे याला आम्ही प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.
- या मोहिमेत शैथिल्य येता कामा नये. त्यामुळे आता बूस्टरचा विचार सुरू नाही, असे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.
- पहिला डोस मिळालेल्याना दुसरा मिळण्याआधी दोन्ही मात्र घेतलेल्यांना बूस्टर देण्याची तूर्त गरज नाही, असेच केंद्र सरकारचे धोरण दिसत आहे.