देशात पहिल्यांदाच मोबाइल अॅपमधून होणार जनगणना, नेमकं काय करावं लागणार? सरकारनं सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 07:44 PM2021-08-10T19:44:52+5:302021-08-10T19:45:59+5:30
देशात पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपात जनगणना करण्यात येणार असल्याची माहिती लेखी स्वरुपात केंद्र सरकारनं संसदेत दिली आहे.
देशात पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपात जनगणना करण्यात येणार असल्याची माहिती लेखी स्वरुपात केंद्र सरकारनं संसदेत दिली आहे. यात एका मोबाइल अॅपच्या माध्यमातून नागरिकांचा डेटा जमा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशात दर १० वर्षांनी जनगणना केली जाते. भारत सध्या जगातील एक असा देश आहे की ज्याची लोकसंख्या वेगानं वाढत आहे. सध्या देशाची लोकसंख्या १३० कोटींहून अधिक आहे. (Centre informs the parliament first time in country the forthcoming census to go digital)
मोबाइल क्रमांक गरजेचा
केंद्र सरकारकडून गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याकडून लेखी स्वरुपात संसदेत माहिती देण्यात आली. मोबाइल अॅपच्या माध्यमातून जनगणना आणि नागरिकांची माहिती जमा केली जाईल अशी माहिती नित्यानंद राय यांनी दिली. यासोबतच जनगणना पोर्टलच्या सहाय्यानं विविध आकडेवारींवर नजर ठेवण्यात येणार आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पोर्टलवर मोबाइल नंबरची गरज असणार आहे आणि नागरिकांसंबंधिची इतर माहितीची देखील आवश्यकता भासणार आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनगणनेसंबंधिची कामं पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचंही सरकारनं यावेळी नमूद केलं आहे.