Coronavirus : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं खासगी वृत्तवाहिन्यांसाठी जारी केली अॅडव्हायझरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 05:45 PM2021-05-30T17:45:48+5:302021-05-30T17:47:26+5:30
Covid 19 Pandemic : जनजागृतीसाठी सरकारला मदत करण्याचं आवाहन. राष्ट्रीय स्तरावरील चार हेल्पलाईन नंबर्स दाखवण्याच्या सूचना. पाहा कोणते आहेत हेल्पलाईन क्रमांक
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही टळलेला नाही. अशा परिस्थितीत सरकारनं रविवारी सर्व खासगी वृत्तवाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. तसंच राष्ट्रीय स्तरावरील चार हेल्पलाईन नंबर्स आपल्या स्क्रीनवर दाखवून लोकांना कोरोनाच्या महासाथीबद्दल जनजागृती करण्यासाठी सरकारची मदत करण्याचं आवाहनही केलं आहे. कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉल, कोविड - योग्य वर्तणूक आणि लसीकरण या तीन बाबींबद्दल जनजागृती करायची असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
"गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारनं निरनिराळ्या माध्यमातून आणि प्रिन्य, सोशल मीडिया आणि अन्य प्लॅटफॉर्म्सच्या सहाय्यानं जनजागृती करण्याचं काम केलं आहे. नागरिकांसाठी सरकारनं हेल्पलाईन नंबर्स केवळ सुरू केले नाहीत, तर त्याद्वारे लोकांना अवगत करण्याचं काम करण्यात येत आहे," असं सरकारनं आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.
"वेळोवेळी येणाऱ्या ब्रेकमध्ये, प्रामुख्यानं प्राईम टाईमच्या दरम्यान वृत्तवाहिन्यांच्या टिकरमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्यांना योग्य वाटेल अशा ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील चार हेल्पलाईन क्रमांकासोबतच कोरोनाविषयी जनजागृती करण्याला चालना द्यावी," असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
#IndiaFightsCorona@MIB_India has issued a #COVID19 advisory to all the private TV channels to promote awareness of the following four national level helpline nos.
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) May 30, 2021
1075 : @MoHFW_INDIA
1098 : @MinistryWCD
14567 : @MSJEGOI
08046110007 : NIMHANS for psychological support pic.twitter.com/VYrhbJkD0e
हे आहेत हेल्पलाईन क्रमांक
सरकारनं जनजागृतीसाठी काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. यामध्ये 1075 (केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय), 1098 (केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाचा बालकांसाठी क्रमांक), 14567 (केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचा ज्येष्ठ नागरिकांकरिता हेल्पलाईन क्रमांक) आणि 08046110007 (मानसिक तणावात मदतीसाठी नीमहंसचा हेल्पलाईन क्रमांक)