खासगी नोकरी करता? मग पुढच्या महिन्यापासून वाढणार तुमचा पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 11:45 AM2019-07-10T11:45:56+5:302019-07-10T11:55:15+5:30

सरकारच्या निर्णयाचा खासगी नोकरदारांना होणार फायदा

Centre reduces ESI contribution to 4 percent from 1st july | खासगी नोकरी करता? मग पुढच्या महिन्यापासून वाढणार तुमचा पगार

खासगी नोकरी करता? मग पुढच्या महिन्यापासून वाढणार तुमचा पगार

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारकडून ईएसआय नियमात बदल३ कोटी ६० लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदाईएसआय कमी केल्यानं पगार वाढणार

मुंबई: खासगी नोकरी करणाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार आहे. सरकारनं कर्मचारी राज्य विमाच्या अंतर्गत कापण्यात येणाऱ्या रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०१९ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून खासगी नोकरदारांचा पगार वाढेल. 

२१ हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांना सरकारच्या निर्णयाचा फायदा होईल. कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) कायद्यानुसार आतापर्यंत खासगी नोकरी करणाऱ्यांच्या पगारातून ६.५ टक्के इतकी रक्कम कापली जात होती. यातील १.७५ टक्के हिस्सा कर्मचाऱ्याचा आणि ४.७५ टक्के हिस्सा कंपनीचा होता. मात्र यापुढे कर्मचाऱ्याच्या पगारातून ४ टक्के इतकीच रक्कम कापली जाईल. यातील ०.७५ टक्के कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार १ टक्क्यानं वाढेल. याचा अर्थ २१ हजार पगार असलेल्यांच्या पगारात २१० रुपयांनी वाढ होईल.

सरकारच्या निर्णयाचा फायदा खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ३ कोटी ६० लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होईल. याचा लाभ कंपन्यांनादेखील होणार आहे. आधी कंपन्यांना कर्मचाऱ्याच्या पगाराच्या ४.७५ टक्के इतकी रक्कम ईएसआयच्या अंतर्गत द्यावी लागायची. मात्र आता हे प्रमाण ३.२५ टक्क्यांवर आल्यानं कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. २१ हजारापेक्षा कमी पगार असलेल्या आणि १० पेक्षा अधिक कर्मचारी संख्या असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना ईएसआय लागू होतो. 
 

Web Title: Centre reduces ESI contribution to 4 percent from 1st july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.