Mucormycosis: ‘ब्लॅक फंगस’चा साथरोग कायद्यात समावेश करावा; केंद्राची नवी नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 04:28 PM2021-05-20T16:28:51+5:302021-05-20T16:31:50+5:30

Mucormycosis: केंद्र सरकारने या आजाराचा साथरोग कायद्यात समावेश केला असून, तसे निर्देश राज्यांना दिले आहे.

centre urged states to make mucormycosis a notifiable disease under the epidemic diseases act | Mucormycosis: ‘ब्लॅक फंगस’चा साथरोग कायद्यात समावेश करावा; केंद्राची नवी नियमावली

Mucormycosis: ‘ब्लॅक फंगस’चा साथरोग कायद्यात समावेश करावा; केंद्राची नवी नियमावली

Next
ठळक मुद्दे‘ब्लॅक फंगस’चा साथरोग कायद्यात समावेश करावाकेंद्राचे राज्यांना निर्देश, नवी नियमावली

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे म्युकरोमायसीस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये काळ्या बुरशीचा आजार झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या आजाराचा साथरोग कायद्यात समावेश केला असून, तसे निर्देश राज्यांना दिले आहे. (centre urged states to make mucormycosis a notifiable disease under the epidemic diseases act)

कोरोना संकटाच्या कालावधीत समोर आलेल्या काळी बुरशी, ब्लॅक फंगस (Black Fungus) किंवा म्युकरमायकोसिस (Mucormycosis) अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आजाराचा साथीच्या कायद्यांर्गत समावेश करावा, असे निर्देश केंद्राकडून राज्यांना देण्यात आले आहे. 'काळ्या बुरशी'ला साथीच्या कायद्यांतर्गत अधिसूचित करून त्यानुसार सर्व प्रकरणांची नोंद करण्याची गरज केंद्रानं व्यक्त केली असून, काळ्या बुरशीची लागण झालेल्या तसेच संशयित रुग्णांची माहिती आरोग्य मंत्रालयाला दिली जाणार आहे, असे सांगितले जात आहे. 

ऐकावं ते नवलच! संकटापासून बचावासाठी थेट कोरोना देवीची स्थापना; धोका कमी होत असल्याचा दावा

नियमावलींचे पालन करणे आवश्यक

तुम्हा सर्वांना विनंती आहे की, म्युकरमायकोसीसचा समावेश साथरोग कायदा १८९७ अंतर्गत करण्यात यावा. यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्र, वैद्यकीय महाविद्यालये यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतील. यामध्ये रुग्णाची तपासणी, आजाराचे निदान आणि उपचार व्यवस्थापन यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर यांनी दिलेल्या सूचनांचेही पालन होईल. याशिवाय, म्युकरमायकोसीसचे संशयित आणि बाधित अशा रुग्णांची आकडेवारी आरोग्यविभागाला जिल्हानिहाय पुरवली जावी. यामध्ये जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचा समावेश असेल, असे आरोग्यमंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

मस्तच! आता Ration Card नसेल तरीही मिळणार मोफत धान्य; सरकारचा दिलासा

वाढत्या रुग्णांची केंद्राकडून दखल

आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव लव अगरवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. तेलंगाण आणि राजस्थानमध्ये म्युकरमायकोसीस आजाराला महामारी घोषित केले आहे. आता केंद्र सरकारने देखील म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांची दखल घेतली असून या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये समावेश करून त्यासंदर्भातील नियमावलीचे योग्य पद्धतीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. 

चिंतेत भर! देशभरात काळ्या बुरशीच्या आजाराचा कहर; रुग्णांची संख्या वाढली

दरम्यान, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशाच्या विविध राज्यांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानमध्ये या आजाराचा धोका वाढताना दिसत आहे. राजस्थानमध्ये तर या आजाराला महामारी घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे या आजाराचे ५० रुग्ण आढळून आले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, मेरठमध्ये ४२ रुग्ण आढळून आले असून, यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतही या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून, एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तेलंगण राज्याने एक नोटिफिकेशन जारी केले असून, सतर्कता आणि सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 
 

Web Title: centre urged states to make mucormycosis a notifiable disease under the epidemic diseases act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.